Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना जोधपूरमध्ये घडली आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. 21 वर्षांच्या मुलाने मित्राच्या मदतीने आपल्या वडिलांनाच संपवले आहे. हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घरजावई होण्यावरुन वाद झाल्यानंतर मुलाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजता रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. मृत व्यक्तीचे नाव शैतानराम बिश्नोई असं होते. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता. शैतानराम यांचा मुलगा मनीष आणि त्याचा मित्र कैलाश यांच्यावर त्यांचा संशय अधिक बळावला. दोघा पिता-पुत्रांमध्ये कौंटुबिक वाद होते आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय होता.
शैतानराम यांची पत्नी अमलादेवी गेल्या साडेतीन वर्षांपासून तिच्या माहेरी राहत होती. अमलादेवी यांना कोणीही भाऊ-बहिण नव्हते. एकुलत्या एक असल्याने त्यांच्या माहेराकडून शैतानराम यांना घरजावई होण्यास दबाव निर्माण करण्यात येत होता. मात्र त्यांनी घरजावई होण्यास नकार दिला. यावरुन त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघही त्यांच्यावर नाराज होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैतानराम यांची पत्नी दोन्ही मुलांसोबत माहेरी राहत होती. तर, तिघांनाही त्यांनीही घरजावई व्हावे, असं वाटतं होतं. मात्र, शैतानराम यांना ते मंजूर नव्हते. म्हणून कित्येक वर्ष ते त्यांच्याच घरात एकटे राहत होते. शेती करुन ते त्यांची गुजराण करत होते. यावरुन या कुटुंबात सतत वाद होत होते. दोघेही मुलं त्यांच्यावर नाराज होते. मनीष हा बेरोजगार होता तर मुलगी स्पर्धा परिक्षेची तयार करत होती.
मनीष हा बेरोजगार असून तो पूर्णपणे नशेत धुत असायचा. वर्षभरापूर्वी त्यांनी शिक्षणही सोडलं होतं. मनीष याने आपल्याच वडिलांना बेदम मारहाण केली यातच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या हत्येनंतर तो त्यांचा मृतदेह तिथेच टाकून फरार झाला होता. पोलिसांनी मनीष आणि कैलासला अटक केली आहे. तर, शैतानरामची पत्नी अमलादेवीलाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैतानराम यांना पाच भाऊ होते. सगळेजण वेगवेगळ्या शहरात राहत होते. शैतानरामदेखील एकटेच राहत होते. व शेती सांभाळत आपले जीवन जगत होते. या प्रकरणात सर्व पुरावेताब्यात घेतले आहेत. तसंच, मुलाला व आईला ताब्यात घेतलं आहे. चौकशी केल्यानंतर अन्य खुलासे होणार आहेत.