"ती ओरडत होती, मी तिचा व्हिडीओ पाहिलाय", Ankita Bhandari प्रकरणात कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा!

Ankita Bhandari प्रकरणात कर्मचाऱ्याचा नवा खुलासा!

Updated: Oct 1, 2022, 10:28 PM IST
"ती ओरडत होती, मी तिचा व्हिडीओ पाहिलाय", Ankita Bhandari प्रकरणात कर्मचाऱ्याचा धक्कादायक खुलासा! title=

Crime News: अंकिता भंडारी हत्याकांडाने (Ankita Bhandari) संपुर्ण देश हादरला आहे. या घटनेबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच पीडितेची कुटूंबीय देखील आक्रोश करत आहे. मुलीला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीयांची घडपड सुरू असतानाच आता या प्रकरणात (Ankita Bhandari Murder Case) एका कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. (new update in ankita bhandari case)

रिसॉर्टच्या मागे पुलकितच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, रिसॉर्टच्या एका कर्मचाऱ्याने त्याला एक व्हिडिओ दाखवला होता. व्हिडीओमध्ये अंकितावर मारहाण करण्यात आली होती. अंकिता रडत होती. त्यानंतर अंकिताची हत्या किंवा हद्दपार केल्याचा संशय त्यांना आला, असं कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.

मी सध्या मजूर म्हणून काम करतो. याआधी मी रिसॉर्टमध्ये काम केलं आहे. पुलकित कर्चमाऱ्यांसोबत मारहाण करतो होता. तर सॅलरी मागितल्यावर देखील त्याला राग येयचा, असं कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.

पैसे नको, आरोपीला मृत्यूदंड द्या -

या घटनेनंतर नुकतंच सरकारने पीडितेच्या कुटूंबियांसाठी 25 लाखाची मदत जाहीर केली होती. अंकिता भंडारीचे (Ankita Bhandari) वडील वीरेंद्र भंडारी यांनी आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) सरकारसमोर,  आम्हाला 25 लाख रुपये नकोत, पण अंकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अंकिता भंडारी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी डीआयजी पी रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी प्रकरणाची माहिती घेतली असून योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय.