Toll Tax on basis of Size: तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. लवकरच तुमच्या गाडीचा टोल टॅक्स (toll tax) कमी होणार आहे. सरकार नवीन टोल धोरण लागू करू शकते. नवीन टोल धोरणानुसार जर तुम्ही एखादे लहान वाहन वापरत असाल तर तुम्हाला हायवे आणि एक्स्प्रेस वेवर कमी टोल टॅक्स भरावा लागेल.
याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) महत्त्वपूर्ण दुरुस्तीनंतर पुढील वर्षी नवीन टोल धोरण जारी करणार. यामध्ये जीपीएस आधारित टोल प्रणालीसोबतच वाहनाच्या आकारावरही टोल टॅक्स अवलंबून असेल, अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.
नवीन धोरणानुसार, तुमच्या कारचा आकार आणि रस्त्यावर दबाव आणण्याची तिची गाडीची क्षमता तुम्हाला टोलवर किती रक्कम द्यावी लागेल हे ठरवेल. नवीन धोरणामध्ये जीपीएस-आधारित टोल प्रणाली समाविष्ट केली जाईल. जी वाहनाचा आकार विचारात घेऊन टोल घेतला जाणार आहेय. सध्याच्या धोरणानुसार रस्त्याच्या ठराविक अंतरावर टोल निश्चित केला जातो.
वाचा : ‘पंतप्रधान राजकारण कसं करतात?’ PM मोदींच्या खासगी डायरीमधील पान होतंय viral
वाहनाच्या आकारावर आधारित कॅब
कार रस्त्यावर किती जागा घेते आणि त्यामुळे रस्त्यावर किती भार निर्माण होतो याची गणना करण्यासाठी, वाहनाच्या आकारावर आधारित टोल आकारला जाईल.
रस्त्यावरील दबाव कसा मोजला जाईल?
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) IIT BHU ला रस्ते आणि महामार्गांवर चालणाऱ्या विविध कारसाठी पॅसेंजर कार युनिट (PCU) ची गणना करण्याची विनंती केली आहे. या प्रकल्पांतर्गत यात कारमधून रस्त्यावरील लोडचा अंदाज घेणे समाविष्ट आहे.