हिसार : 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमित रामरहीम सिंगच्या अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. सेक्स अॅडीक्ट असलेल्या राम रहीमच्या लैंगिक शोषणाच्या अनेक साध्वी बळी पडल्याचे समोर येत आहे.
अशात एका साध्वीने एक नवा खुलासा केला आहे. रामरहीम रोज एका मुलीला रात्री आपल्या गुहेत बोलवत असे. परंतु, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी साध्वी पाळी आल्याचा बहाणा करायच्या', असा दावा डेऱ्यात राहिलेल्या एका साध्वीनं केला आहे.
राम रहीमने रात्री बोलवल्यानंतर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी किंवा त्याच्या अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी साध्वी पाळी आल्याचा बहाणा करत होत्या. एका खासगी चॅनलशी बोलताना साध्वीने डेऱ्यात हा प्रकार सांगितला आहे. डेऱ्यात असलेल्या साध्वींना रोज रात्री रामरहीमच्या गुहेत बोलावले जायचे. गुहेत बोलावल्यानंतर साध्वी जात असत परंतु परत आल्यानंतर काहीही बोलत नसत.
इतकेच नाही तर ‘गुहेत जाणाऱ्या मुलींना धमकी दिली जायची. रामरहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर त्यांच्या भावाची हत्या करण्यात येईल’, असे सांगितले जायचे. ‘एका रात्री मलाही गुहेत जाण्यासाठी बोलावणं आलं. आत गेल्यानंतर माझ्यासोबत काय होणार आहे, याचा अंदाज मला आला. परंतु मला पाळी आली आहे, असं मी रामरहीमला सांगितलं, आणि माझी सुटका करून घेतली. रामरहीमपासून वाचण्यासाठी बऱ्याचदा साध्वी पाळी आल्याचं रामरहीमला सांगायच्या, असा दावाही या साध्वीनं केला.
राम रहीम हा शाळा आणि आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा. तसेच डेऱ्यातील हॉस्पिटलमध्ये गर्भपात करायचा. डेऱ्याच्या आश्रमातील 'शाही बेटियां'मध्ये राहणाऱ्या मुलींवर रामरहीम नेहमी बलात्कार करायचा, असा आरोप गुरूदास सिंह तूर यांनी केला.