पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट

पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. आता पासपोर्टवरील तुमचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 12, 2018, 06:12 PM IST
पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट title=

नवी दिल्ली : पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. देशात ज्याच्याकडे पासपोर्ट असेल तर तो बिनधास्त असायचा. कारण कोणत्याही कामासाठी पासपोर्ट हा महत्वाचा पुरावा ठरत होता. मात्र, आता पासपोर्टवरील तुमचा घराचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत आहे. 

पत्ता पुराव्यासाठी 'आधार कार्ड'चं 

पासपोर्ट म्हटले की, फोटो आयडेंटिटी, घरचा पत्ता, जन्मतारीख आदी सगळी माहिती असते. मात्र पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. कारण पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता छापला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे असे झाल्यास घरच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी 'आधार कार्ड'चं महत्वाचं ठरेल.

पासपोर्टच्या शेवटच्या पान कोरेच

अजून तरी पासपोर्टच्या पहिल्या पानावर प्रवाशाचा फोटो आणि त्याची खासगी माहिती देण्यात येत आहे. शेवटच्या पानावर त्याचा पत्ता दिलेला असतो. मात्र यापुढे पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पत्ता न छापण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच या पानाचा रंगही बदलणार येणार आहे, अशी माहिती मिळतेय.

पासपोर्टवर असणारा पत्ता आतापर्यंत राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येत होता. पण या पुढे मात्र पासपोर्ट हा राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येणार नाही. कारण केंद्र सरकारने पासपोर्टवर प्रवाशाचा पत्ताच न छापण्याचे ठरविलेय. पासपोर्टच्या नवीन सिरीजपासून पासपोर्टचे शेवटचे पान हे कोरेच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

यासाठी हा घेतला निर्णय?

प्रवासाची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजुन तरी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, संबंधित मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे यापुढे 'आधार कार्ड' हे पत्त्यासाठी महत्वाचा पुरावा ठरणार आहे.

जुन्यांसाठी दिलासा

दरम्यान, नवीन पासपोर्ट धारकांना आधार कार्ड हा पुरवा तर जुन्या पासपोर्ट धारकांना त्यांचा पासपोर्ट नुतनीकरण होईपर्यंत त्यांचा राहत्या ठिकाणाचा पुरावा म्हणून दाखवता येणार आहे.