Vivek Agnihotri Manipur: बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे द काश्मिर फाइल्स या चित्रपटासाठी ओळखले जातात. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सतत घडणाऱ्या घडामोडींवर विवेक अग्निहोत्री हे त्यांची प्रतिक्रिया देताना दिसतात. विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, मणिपूरमधील सध्य परिस्थिती पाहता त्यावर चित्रपट बनवण्यास विवेक अग्निहोत्री यांना एका नेटकऱ्यानं सांगितलं.
शुक्रवारी विवेक अग्निहोत्री यांनी 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' विषयी सांगत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये कश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचाराविषयी सांगण्यात आले आहे. विवेक या ट्वीटमध्ये म्हणाले होते की 'भारतीय न्यायव्यवस्था कश्मीरी हिंदू नरसंहारवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहे. आता देखील आपल्या संविधानानं दिलेल्या वचनानुसार कश्मीरी हिंदूंचे अधिकार हे त्यांची रक्षा करण्यासाठी अपयशी ठरले आहेत.'
Thanks for having so much faith in me. Par saari films mujhse hi banwaoge kya yaar? Tumhari ‘Team India’ mein koi ‘man enough’ filmmaker nahin hai kya? https://t.co/35U9FMf32G
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 21, 2023
हेही वाचा : मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर
विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्वीट पाहता एका नेटकऱ्यानं त्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं की 'वेळ वाया घालवू नकोस, जर तुझ्यात हिंमत असेल तर जा आणि आणखी एक चित्रपट बनव मणिपूर फाइल्स.' नेटकऱ्याच्या या मागणीवर उत्तर देत विवेक अग्निहोत्री म्हणाले की 'धन्यवाद की तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. पण अशा सगळ्या विषयांवर मी एकटाच चित्रपट बनवू का?, तर तुमच्या 'इंडिया टीम' मधील चित्रपटसृष्टीतील कोणी दिग्दर्शक नाही का?'
गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी कुकी समुदाय आणि मेतई समुदायात जातीतील दर्जावर वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता पर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हजार पेक्षा जास्त लोक जखमी आहेत.इतकंच नाही तर त्या वादात मेतई समुदायातील लोकांनी कुकी समुदायातील तीन महिलांना विवस्त्र करून त्यांना रस्त्यावरून नेलं होतं. त्याचवेळी त्यातील एक महिलेचे त्यांनी शारीरिक शोषण केले. त्यातील 2 महिला या त्यांच्या 20 शीतील होत्या तर एक महिला ही 40 शीतील होती. असे म्हटले जाते की 40 शीत असलेल्या महिलेचे पती हे कारगिल युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त सैनिकाच्या पत्नी आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु झाली आहे की त्यांनी देशाला किती काय दिलं आणि देशानं त्यांनी परत काही दिलं तर तो अपमान आहे. (Manipur Violence