मंदिरात जायला निघालेल्या तरुणीचं अपहरण, 4 दिवस डांबून ठेवले, नंतर भांगेत कुंकु भरले अन्...

Raped On Women: मंदिरात निघालेल्या तरुणीचे अपहरण करुन तिला एका सुनसान परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 16, 2023, 01:59 PM IST
मंदिरात जायला निघालेल्या तरुणीचं अपहरण, 4 दिवस डांबून ठेवले, नंतर भांगेत कुंकु भरले अन्...  title=
neighbor kidnap girl and raped on her crime news in up

Raped On Women: मंदिरात (Temple) जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन चार दिवस तीला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर चार दिवस सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Raped On Women) करण्यात आले. पीडित तरुणीची आरोपीच्या कचाट्यातून सुटका झाल्यानंतर तीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना (Police) सांगितला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोरखपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Raped On Women In UP)

मंदिरात घेऊन जाण्याचा बहाणा केला

राम गढताल येथे राहणाऱ्या तरुणीचे तिच्याच शेजारी राहणाऱ्या युवकाशी ओळख होती. चार दिवसांपूर्वी तरुणी मंदिरात जाण्यासाठी म्हणून घरातून निघाली. त्याचवेळी युवकाने मंदिरात नेण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसायला सांगितले. त्यानंतर तो तिला घेऊन एका सुनसान ठिकाणी घेऊन गेला व एका घरात डांबून ठेवले. इतकंच नव्हे तर, युवकाने तरुणीच्या भांगेत कुंकु भरुन तिच्यावर बलात्कार केला. 

सुनसान घरात डांबून ठेवले

बराचवेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून आई-वडिल काळजीत पडले. त्यांनी तिला परिसरात शोधायला सुरुवात केली. मात्र तरीही तिचा काही पत्ता लागला नाही म्हणून घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत शोध सुरु केला. या दरम्यान सर्विलान्सच्या मदतीने तरुणीला शोधून काढले आणि तिच्या घरच्यांकडे सुपूर्द केले. 

आरोपीला केली अटक 

पीडीतेने दिलेल्या जबाबानंतर रामगढ पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने त्याचे राहते घर बदलले होते व एका ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी त्याच्या नव्या घराचा पत्ता शोधून काढत त्याला अटक केली आहे. त्याच्यावर अपहरण व लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.