नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक झाली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण हे राज्यसभेचे नवे उपसभापती असणार आहे. विरोधकांनी पाठिंबा दिलेल्या काँग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे के पी जे कुरियन १ जुलैला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना 125 मतं मिळाली तर काँग्रेसचे बी. के हरिप्रसाद यांना 105 मतं मिळाली.
पंतप्रधान मोदींनी हरिवंश यांचं अभिनंदन केलं. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचं मोदींनी कौतूक देखील केलं. भाजपने राज्यसभेच्या सर्व खासदारांना निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचा आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
एनडीएकडे समर्थन कमी होतं पण इतर काही पक्षांना सोबत घेऊन त्यांनी बाजी मारली. ओडिशामधील बीजेडी, तमिळनाडूच्या एआयएडीएमके आणि तेलंगणाच्या टीआरएसने बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी समर्थन मागितल्यानंतर एनडीएच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला.