बॉलिवूड अभिनेत्रीसोबत Praful Patel यांचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री ठेका धरला

Updated: Dec 20, 2021, 04:08 PM IST
 बॉलिवूड अभिनेत्रीसोबत Praful Patel यांचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल सध्या त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचा मुलगा प्रजयचं लग्न जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये जल्लोषात पार पडलं.

या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या कलाकरांनी या लग्नाला खास हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे. 

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी, अनिल कपूरसोबत यांना देखील आमंत्रित केलं होतं. त्यामुळे कलाकारांना लग्न सोहळ्याला हजेरी लावत चार चाँद लावले, ''जुम्मे की रात'' या गाण्यावर या कलाकारांनी ठेका धरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत स्टेजवर ठेका धरला. राजकीय नेते आणि कलाकार या सोहळ्याला एकत्र वेळ घालवताना दिसले.

प्रफुल्ल पटेल यांच्या नव्या सूनबाईंबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईतील व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्यासोबत 18 डिसेंबरला लग्न पार पडलं. 

शिरीष हे मूळचे राजस्थानचे राहणारे आहेत. त्यामुळे जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये लग्न पार पडलं.यावेळी उद्योगपती सज्जन जिंदल, अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेलचे सुनील भारती, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदुजा या मोठ्या उद्योगपतींनी हजेरी लावली. 

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी देखील लग्नाला उपस्थिती दर्शवली. क्रिकेटर रवी शास्त्री ही या लग्नाला हजर होते.