Mig-29K फायटर जेटला अपघात - गोवा विमानतळावरील वाहतुक थांबवली

गोव्यात आज रनवेवर एका विमानाचा अपघात झाला आहे. या अपघतामध्ये अजूनही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Updated: Jan 3, 2018, 02:27 PM IST
Mig-29K फायटर जेटला अपघात - गोवा विमानतळावरील वाहतुक थांबवली  title=

गोवा : गोव्यात आज रनवेवर एका विमानाचा अपघात झाला आहे. या अपघतामध्ये अजूनही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

कसा झाला अपघात ? 

गोवा एअरपोर्टवर मिग २९ के हे एअरक्राफ्ट रनवेवर घसरल्याने अपघात झाला. नेव्हीच्या या विमानाला टेक ऑफ घेताना आग लागली. या अपाघातामध्ये एक ट्रेनी पायलट होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच ट्रेनी पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच विमानाला लागलेली आगही विझवण्यात आली आहे.  

 

 

ANI  ने दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर गोवा एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले आहे.