नवी दिल्ली : आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017  ही तारीख अंतिम करण्यात आली आहे.  जर तुम्ही अजूनही आधारला मोबाईल नंबर लिंक केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टेलीकॉम कंपन्यांनी अशी व्यवस्था केली होती की ज्यामुळे ग्राहक घरबसल्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करू शकतात. कंपन्यांनी ही व्यवस्था 1 जानेवारीपासून सुरू केली होती. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही.

हा आहे नंबर

काही मिनीटातच घरबसल्या तुम्ही आधार-मोबाईल लिंक करू शकता. आधार अथॉरिटी यूआयडीएआयने एक नंबर सुरू केला आहे. या नंबरवर कॉल करून आधारशी संबंधित सर्व माहिती दिल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक होईल. यासाठी यआधार अथॉरिटीने युजर्सला मेसेज पाठवण्यास सुरूवात केली आहे. या मेसेजमधून ग्राहकांना टोल फ्री नंबरसंदर्भात माहिती दिली जाईल.

अशी आहे प्रक्रीया

ही प्रक्रीया ओटीपीवर आधारीत आहे. 1 जानेवारीपासून या सुविधेचा अवलंब सुरू झाला. आता कोणीही युजर मोबाईल नंबरवरून 14546 हा टोल फ्रि नंबर डायल करून मोबाईल-आधार लिंक करू शकतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला आधार नंबर विचारण्यात येईल. त्यानंतर पुढची प्रक्रीया होईल.

तुमची अचूक माहिती द्या

त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर 'वन टाइम पासवर्ड' (OTP) येईल. तो OTP दिल्यानंतर मोबाईल-आधार लिंक होईल. मात्र यासाठी अचूक माहिती देणे गरजेचे आहे. तुमची माहिती यूआयडीएआय सिस्टीम व्हेरिफाय करेल.

अचूक माहिती दिल्यानंतरच आधार-मोबाईल लिंक होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा कमीत कमी एक मोबाईल नंबर रजिस्टर असणे गरजेचे आहे. असे नसल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

यांच्यासाठी घरबसल्या सेवा

याशिवाय 70 वर्षांहून अधिक वयाच्या लोक, अनिवासी भारतीय आणि अपंग यांचा मोबाईल नंबर कंपन्या घरी जावून आधारशी लिंक करतील. सरकारने तसे आदेशच दिले आहेत. सध्या हा आयएव्हीआर नंबर फक्त एअरटेल, आयडिया आणि वोडाफोनसाठी काम करत आहे. जिओ, बीएसएनएल आणि एमटीएनएल ग्राहकांना या सुविधेसाठी वाट पाहावी लागेल. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
just call on this number to link aadhar card and mobile number
News Source: 
Home Title: 

आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी फक्त 'या' नंबरवर कॉल करा...

आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी फक्त 'या' नंबरवर कॉल करा...
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक

आता मिळणार घरबसल्या सेवा

काय आहे प्रक्रिया?

Authored By: 
Darshana Pawar