अरबी समुद्रात भारतीय हद्दीत येताच नौदलाने असे केले राफेल विमानांचे स्वागत

भारतीय वायुसेनेच्या इतिहासात आजचा दिवस खूप खास ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचत आहे. युएई पासून उड्डाणानंतर थोड्याच वेळात पाच राफोल विमानं भारतीय हवाईहद्दीत आले. त्यानंतर राफेलचे नियंत्रण कक्षाने स्वागत केले.

Updated: Jul 29, 2020, 02:58 PM IST
अरबी समुद्रात भारतीय हद्दीत येताच नौदलाने असे केले राफेल विमानांचे स्वागत title=

मुंबई : भारतीय वायुसेनेच्या इतिहासात आजचा दिवस खूप खास ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचत आहे. युएई पासून उड्डाणानंतर थोड्याच वेळात पाच राफोल विमानं भारतीय हवाईहद्दीत आले. त्यानंतर राफेलचे नियंत्रण कक्षाने स्वागत केले.

राफेल विमानांनी युएई येथून उड्डाण करताच काही वेळेतच भारतीय हवाईहद्दीत प्रवेश केला. जेव्हा ही विमान अरबी समुद्रावरुन भारतीय हद्दीत आले तेव्हा आयएनएस कोलकाता कंट्रोल रूममधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

असं होतं संपूर्ण संभाषण

आयएनएस कोलकाता: हिंद महासागर हद्दीत आपले स्वागत आहे.

राफेल पायलट: खूप खूप धन्यवाद. भारतीय सागरी जहाजे आमच्या सागरी सीमेचे रक्षण करीत आहेत, हे खूपच संतुष्टी देणारं आहे.

आयएनएस कोलकाता: तुम्ही आकाशाच्या उंच टोकाला स्पर्श करा, तुमचे लँडिंग यशस्वी होईल.

राफेल पायलट : विश यू फेयर विंड्स. हॅप्पी हंटिंग. ओव्हर अँड आऊट