Viral News : नवरात्रौत्सव (Navratri 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. कोरोनाचे (Corona) निर्बंध शिथील झाल्यानं यंदा सर्वत्र दांडियाची धूम पाहायला मिळणारंय. मात्र या दांडिया उत्सवात मुस्लिमांना सहभागी होता येईलच असं नाही. कारण दांडिया खेळायचा असेल तर ओळखपत्र (Identity Card) दाखवावं लागणारंय. ज्या मुस्लिमांना मूर्ती पूजा मान्य असेल त्यांनाच दांडियात प्रवेश दिला जाईल.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर (Usha Thackur) यांनी हा नियम केलाय. ज्या मुस्लिम युवक युवतींना दांडिया खेळायचाय त्यांनी मूर्तीपूजा मान्य करावी आणि येताना आपल्यासोबत घरातील महिलांनाही आणावं, तुमचं स्वागतच होईल, असंही उषा ठाकूर यांनी म्हंटलंय. मध्य प्रदेशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत पत्रंही पाठवलंय.
हिंदू संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर अनेकांनी सरकारची भूमिका म्हणजे धार्मिक द्वेष पसरवण्याचं कारस्थान असल्याचं म्हंटलंय. सध्या हा निर्णय मध्य प्रदेशपुरताच मर्यादीत आहे. मात्र मध्य प्रदेशच्या निर्णयाचा इतर राज्येही कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयावरून देशभर वाद पेटण्याची चिन्ह आहेत.