Share Market: योग्य शेअर खरेदी करण्यासाठी वापरा Top 10 Investment Tips

Investment Tips : शेअर बाजारात (Share Bazar) कोणता शेअर खरेदी (Share to buy) करावा? शेअर खरेदी करताना कोणत्या घटकांचा विचार करायला पाहिजे?  अशा अनेक प्रश्नांवर उत्तर म्हणजे शेअर बाजार अभ्यासक अनिल सिंघवी याच्या टॉप 10 इन्व्हेस्टमेंट टिप्स (top 10 investment tips). 

Updated: Sep 13, 2022, 06:56 PM IST
Share Market: योग्य शेअर खरेदी करण्यासाठी वापरा Top 10 Investment Tips title=

Share Market Portfolio : भरगच्च नफा मिळावा म्हणून अनेकजन शेअर बाजारात (Share Bazar Investment) गुंतवणूक करतात. काहीजण तर या शेअर बाजाराच्या योग्य गुंतवणूकीतून कोट्याधीश झाले तर काहीजणांना गुंतवलेली रक्कम देखील परत मिळवता आली नाही. योग्य शेअरची निवड कशी करावी? कोणत्या घटकांचा अभ्यास करुन शेअरमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे? अशा अनेक प्रश्नांवर झी बिझनेसचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल सिंघवी (Anil Singhvi) यांनी सांगितलेल्या टॉप 10 इन्व्हेस्टमेंट टिप्स (top 10 investment tips) उपयोगी ठरतील.

योग्य शेअर निवडताना 'या' टॉप 10 टिप्सचा वापर करा...

1. तुम्ही जो शेअर खरेदी करण्याजा विचार करताय त्या कंपनीचं मॅनेजमेंट उत्तम असावे आणि प्रमोटर विश्वासू असावा. या दोन्हींचं उत्तम कॉन्बिनेशन असणारा शेअर गुंतवणूकीसाठी (Share Market Investment) योग्य ठरु शकतो.

2. कंपनीचा डेव्हिडेंट (Dividend), प्रॉफिट (Profit) आणि इनकम (Income) चांगल्या दर्जाचा असावा. या तीन घटकांचा अभ्यास करुन योग्य तो शेअर खरेदीसाठी निवडावा.

3. शेअर निवडताना तो चांगला आणि स्वस्त देखील असावा. करेक्शनच्यावेळी कमी किंमतीत उत्तम शेअर खरेदी करण्याची संधी मिळते आणि या शेअरमुळे मोठा फायदा देखील होऊ शकतो.

4. फंड, FII किंवा मोठ्या गुंतवणूकदारांनी कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे, याचा अभ्यास शेअर खरेदी करताना करायला पाहिजे. अशा शेअरला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायला हवं.

5. ज्या कंपनीवर कर्ज कमी असेल आणि त्यासोबतच कॅशसुद्धा जास्त असेल अशाच शेअरमध्ये गुंतवणूक करा. कंपनीने काही कामासाठी कर्ज घेतले असेल तरी ते फेडले जात असेल आणि कॅश रक्कमही कंपनीच्या रिझर्व्हमध्ये असेल तरच त्या शेअरमध्ये गुंतवणूक करा, फक्त बुकमध्येच डेबिट-क्रेडिट असू नये.

6. प्रमोटरचे शेअर्स गहाण असू नयेत. प्रमोटरचे शेअर्स तारण ठेवलेले असतील तर अनेक प्रश्न निर्माण होतात. 

7. तुम्ही ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात ती इंडस्ट्री आणि सेक्टर,  पुढच्या 10-15 वर्षांत कशी कामगिरी करू शकेल हे पाहण्यासाठी येत्या काही वर्षांत त्या क्षेत्राची आणि उद्योगाची वाढ देखील पहायला पाहिजे.

8. ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे त्या क्षेत्राबाबत सरकारचं धोरण वारंवार बदलतोय का? याचा अभ्यास करा.

9. जे शेअर खरेदी करायचे आहेत त्यामध्ये आयात-निर्यातीत किती धोके आहेत याकडे देखील लक्ष पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही हेही विचारात घ्यायला हवं की ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहात ती कंपनी येत्या 15 वर्षानंतरही टिकेल का?

10. शेअर्स निवडताना तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही हा व्यवसाय कराल का? अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील आणि शेअर का खरेदी करायला पाहिजे? याविषयीचं ज्ञानही वाढेल. शेअर खरेदी करताना असा विचार करू नका की तुम्ही तो शेअर खरेदी करत आहात, तर तुम्ही त्या व्यवसायात भागीदार होत आहात असा विचार करायला पाहिजे.