नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यानंतर, नरेंद्र मोदी लगेच आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जातील. यानंतर रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी बोलवतील.
शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांनी मोदींना संसदीय दलाचे नेतेपदी निवडण करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार, शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि एनडीएच्या इतर प्रमुखांनी समर्थन दिलं.
BJP President Amit Shah: I thank all the allies and the MPs who have unanimously chosen NDA's leader Narendra Modi as the new Prime Minister of the country. pic.twitter.com/CZU7gzK6lt
— ANI (@ANI) May 25, 2019
Delhi: Narendra Modi seeks blessings from senior BJP leader LK Advani, at the NDA meeting. He has been elected as the leader of BJP & NDA. pic.twitter.com/WfKKWEDc3j
— ANI (@ANI) May 25, 2019
#WATCH Delhi: NDA elects Narendra Modi as its leader, at the NDA Parliamentary meeting. pic.twitter.com/7xlSaqfRCj
— ANI (@ANI) May 25, 2019
Narendra Modi elected as the leader of the NDA. pic.twitter.com/CPuCtE4Rye
— ANI (@ANI) May 25, 2019
SAD's Parkash Singh Badal proposes Narendra Modi's name as the leader of NDA Parliamentary Party. JDU Chief Nitish Kumar and Shiv Sena Chief Uddhav Thackeray endorse the proposal. pic.twitter.com/2eGPHh21qD
— ANI (@ANI) May 25, 2019
Delhi: Senior BJP leaders LK Advani and Murli Manohar Joshi are also present at the NDA parliamentary meeting. pic.twitter.com/Vyjr28tosH
— ANI (@ANI) May 25, 2019
Delhi: SAD's Parkash Singh Badal, Shiv Sena chief Uddhav Thackeray and BJP leaders Sushma Swaraj & Nitin Gadkari greet Narendra Modi after he was elected as the leader of NDA & BJP at the NDA meeting, today. pic.twitter.com/gOFrWBlj0q
— ANI (@ANI) May 25, 2019
लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपलाच बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या. ३०३ जागांवर भाजपचा विजय झाला, तर भाजप आणि मित्रपक्षांचे मिळून ३५४ खासदार निवडून आले.
सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारिख ठरवली जाईल. या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. यानंतर काही दिवसानंतर एनडीएच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.