मुंबई : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे(PM Modi Birthday). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म 17 सप्टेंबर 1950 साली एका सर्वसामान्य घरात झाला. पण जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते भारताचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत. खुद्द पीएम मोदींनी सांगितले आहे की, ते लहानपणी चहा विकायचे. गरीब कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी संघर्ष केला आणि ते भारताचे पंतप्रधान झाले. PM मोदींच्या लहानापणीच्या काही खास आठवणी....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव हिराबेन आहे. पीएम मोदींच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद मोदी होते. लहानपणी स्टेशनवर चहा विकल्याची माहिती खुद्द पीएम मोदींनीच दिली होती. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी स्टेशनवरून जाणाऱ्या सैनिकांना चहा दिला होता. (modi birthday wishes)
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी वडनगर येथील भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत शिकण्यासाठी जात असत. लहानपणी एकदा पीएम मोदींनी तलावातून मगरीच्या पिलाला पकडून त्याच्या घरी आणलं होतं. मात्र, आईच्या समजूतीनंतर त्यांनी मगर पिलाला पुन्हा तलावात सोडलं. (pm modi birthday wishes)
शालेय शिक्षणादरम्यान पीएम मोदीही एनसीसीमध्ये देखील सक्रिय होते. याशिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्यही झाले. पंतप्रधान मोदी मेहनती आणि निष्ठावंत होते. पुढे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या जबाबदाऱ्याही मिळाल्या. अशाप्रकारे हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील त्यांचा दर्जा वाढत गेला.
1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि विरोधी नेत्यांना पकडून तुरुंगात टाकले जात होते, तेव्हा त्यांनी शीखांचा वेश धारण करून तेथून पळ काढला. पंतप्रधान मोदींबद्दल असं देखील सांगण्यात येतं. (PM Modi 72nd Birthday)
पीएम मोदींना लहानपणापासूनच प्रवासाची आवड आहे. 90 च्या दशकात ते पहिल्यांदा अमेरिकेला गेले होते. त्यानंतर पीएम मोदींनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाहेर फोटो देखील क्लिक केले. पंतप्रधान होण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी भारतातील विविध राज्यांचा दौरा केला होता. बाकी भाजपची जबाबदारी निभावत असतानाही ते अनेक राज्यात फिरले.