नवी दिल्ली : भाजपचे खासदार नाना पटोले दिल्लीत होत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीला अनुपस्थित आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत देशातले भाजपचे सर्व खासदार, आमदार, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
नाना पटोले यांनाही या बैठकीत उपस्थित राहण्याचं निमंत्रण होतं. पण मतदारसंघातल्या कामांच्या निमित्तानं बैठकीला न जाणंच पटोलेंनी पसंत केलं. गेल्या काही दिवसांत नाना पटोले सातत्यानं मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत.
वारंवार केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणावर पटोले टीका करत आहेत. त्यामुळेच पटोले कार्यकारिणीला गेले नाहीत ना याचीच सध्या चर्चा रंगत आहे.