माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनीने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला.  

Updated: Jul 21, 2020, 02:25 PM IST
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न title=

बंगळुरु : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनीने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. काल रात्री तुरुंगात एका दुसर्‍या कैद्याशी त्याचा झगडा झाला. त्यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर सध्या तुरूंगातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील निवडणूक प्रचारादरम्यान बॉम्बस्फोटाने हत्या करण्यात न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर नलिनी तामिळनाडूच्या वेल्लोर तुरूंगात आहे. जिथे काल रात्री तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. नलिनी यांचे वकील पुगलेधी यांनी याबाबत माहिती दिली.

 जेलमध्ये नलिनी आणि कैदी यांच्यात कथित भांडण असल्याचे वकिलाने सांगितले. तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कैदीने तुरूंगात भांडणाची तक्रार केली. त्यानंतर नलिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे तिच्या वकिलाने सांगितले. नलिनीचं तिच्यासोब जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झाले होते. दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.