'हे' तर फक्त निमित्तमात्र, कारण मात्र उद्याप गुढ... लग्नाच्याच रात्री नववधूची आत्महत्या

ज्या घरात दोन दिवसापूर्वी आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात नववधूच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे.

Updated: May 19, 2022, 03:08 PM IST
'हे' तर फक्त निमित्तमात्र, कारण मात्र उद्याप गुढ... लग्नाच्याच रात्री नववधूची आत्महत्या title=

मुंबई : लग्न हा क्षण प्रत्येक मुला मुलीसाठी खूप महत्वाचा असतो. ज्यामुळे दोघांच्याही आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे की, लग्नाच्याच रात्री एका नववधूने आपलं आयुष्य संपवलं आहे. ज्या घरात दोन दिवसापूर्वी आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात नववधूच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

माळ येथील नारायणपूर गहदो येथील अमित यांची मुलगी संध्या हिचा विवाह, नौबस्ता सालेहनगर येथील रहिवासी ठाकुरदीन यांचा मुलगा अमर बहादूर याच्याशी ठरवला होता. या लग्नात कोणतीही कमतरता राहू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली. वराची हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण झाली.

फक्त गरीब आर्थिक परिस्थितीमुळे, विनंती केलेल्या Apache बाईकऐवजी मुलाला Splendor खरेदी करुन देण्यात आली. ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण पेटलं.

नक्की काय घडलं? 

रविवारी 15 मे रोजी वरात मुलीच्या घरी पोहोचली. मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वर आणि त्याचे मित्र नाचत-गात स्टेजवर पोहोचले. तिथे जयमलचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर जेव्हा नवरदेवाचं लक्ष हुंड्यामध्ये मिळालेल्या बाईवर पडलं, ज्यामुळे तो संतापला आणि त्याने लग्नासाठी नकार दिला. ज्यामुळे नवरदेव अचानक मंडप सोडून निघून गेला.

त्याच वेळी घरातील मुलीकडच्या महिलांनी दागिने पाहून नाराजी व्यक्त केली. या मुद्यावर दोन्ही पक्षात बराच वेळ वाद सुरु होता,

अखेर राग न आवरल्याने नवरदेव आणि त्याचे जवळचे नातेवाईक तेथून निघून गेले. खरंत वराकडच्या लोकांना नववधूला दागिने द्यायचे नव्हते, ज्यामुळे त्यांनी बाईकचं कारण सांगून हे टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकी केवळ निमित्त असल्याचं गावकरी सांगत आहेत.

या घटनेने हादरलेल्या नववधू संध्याने त्याच सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

पोलिसांचे असे म्हणणे आहे की, पीडितेच्या कुटुंबीयांनी कोणावरही आरोप केलेला नाही. खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून मात्र तपास सुरू आहे.