Systematic Investment Plan: आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरते. सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. हल्ली अनेकजण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात. असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले नाही म्हणून ओरड करतात. पण आपण केलेल्या काही छोट्या चुका आपल्या कमी रिटर्न्सला कारणीभूत ठरतात. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही छोट्या रक्कमेचे मोठ्या फंडमध्ये रुपांतर करु शकता. एसआयपी ही मार्केटसोबत लिंक असल्याने यामध्ये रिस्कदेखील असते.
पण 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात.याबद्दल जाणून घेऊया.
एसआयपी सुरु करण्याआधी तुम्हाला रिसर्च करणे आवश्यक असते. नेहमी कोणतीही एसआयपी घेण्यााधी संशोधन करा. किंवा तुमच्या सल्लागाराची मदत घ्या. यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. यामध्ये संभाव्य नुकसान होण्याची रक्कमदेखील असू शकते. नुकसान टाळून जास्त रिटर्न्स मिळवण्यासाठी सर्वात आधी रिसर्च करा आणि त्यानंतरच एसआयपी करा.
जास्त रक्कम नाही म्हणून एसआयपी करत नाही, अशी ओरड अनेकजण करतात. पण प्रत्यक्षात तुम्ही कमी रक्कमेतूनही एसआयपी सुरु करु शकता. एकदम मोठी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवल्यास तुम्हाला नुकसानदेखील होऊ शकते. अचानक कोणती आर्थिक समस्या आली तर मोठी रक्कम काढल्याने मिळणाऱ्या रिटर्न्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या रक्कमेच्या 2 ते 3 एसआयपी सुरु करु शकता.
एसआयपी गुंतवणूक लॉंग टर्मसाठी बेस्ट असते. जितका जास्त काळ तुम्ही गुंतवणूक कराल, तसे तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. पण मध्येच एसआयपी बंद केलात तर तुम्हाला चांगल्या रिटर्न्सचा फायदा घेता येणार नाही. गुंतवणूकदार उत्साहात एसआयपी सुरु तर करतात पण बाजारात मंदी आल्यावर किंवा बाजार पडल्यावर आपली गुंतवणूक काढून घेतात. असं अजिबात करु नये. असं केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मंदीवेळी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. ती वेळ निघून गेली की मार्केट पुन्हा उसळी घेते. हे चक्र असे सुरुच राहते.
एसआयपी करण्यााधी तुम्हाला एसआयपी रक्कम गुंतवणुकीचे टार्गेट ठरवायला हवे. तुमच्या मुलाचे लग्न, शिक्षण किंवा रिटायर्टमेंटसाठी तुम्ही एसआयपी प्लानिंग करु शकता. या कामासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे, हे तुमच्या मनात ठरलेले असते. त्यानुसार तुम्ही गुंतवणुकीचा अंदाज लावू शकता.