मुंबई : जर तुम्ही बाजारात (share Market)मध्ये कमाई करू इच्छिता परंतु गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात असाल तर, महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने न्यू फंड ऑफर लॉंच केला आहे. हा नवा ऑफर(Mutual Fund NFO)आज म्हणजेच 30 जुलै रोजी खुला होणार आहे. यामध्ये 13 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येईल. ही एक ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम आहे. जी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप सारख्या मार्केट कॅपमध्ये गुंतवणूक करेल. महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडने आपल्या वेबसाईटवर यासंबधीची माहिती दिली आहे.
कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक
महिंद्रा मॅनुलाइफ म्युचुअल फंडच्या या स्किममध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. जर तुम्ही SIP करू इच्छित तर 500 रुपयांची कमीत कमी 6 इंस्टालमेंट गरजेचे आहेत.
तुमचा पैसा कुठे गुंतवला जाईल
महिंद्रा मॅनुलाइफ फ्लॅक्सी कॅप योजना आहे. या माध्यमातून इक्विटी आणि इक्विटीशी संबधीत सेक्युरिटीजमध्ये कमीत कमी 65 टक्के गुंतवणूक असणार आहे. तसेच 35 टक्के रक्कम डेट म्हणजेच मनी मार्केट सेक्युरिटीज मध्ये गुंतवली जाणार आहे. हा नवीन फंड 30 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे.