अयोध्या : उत्तर प्रदेशच्या अयोध्येत सध्या गेल्या 2 दिवसांपासून वातावरण तापलं आहे. राम मंदिराची मागणी जोर धरु लागली आहे. एकीकडे शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसह राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी अयोध्येत आहेत. तर विश्व हिंदू परिषदेने देखील हजारो साधु-संतांच्या उपस्थितीत एकाच मंचावर धर्मसभा आयोजित केली आहे. संपूर्ण अयोध्येत राम मंदिराची चर्चा आहे. यावर मुस्लीम वर्ग काय विचार करतोय पाहा...
इकबाल अंसारी
राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात अंसारी यांनी अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केल्या गेलेल्या व्यवस्थेवर संतोष व्यक्त केला आहे. पण तेथे जमाव बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं का जमली आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, जर कोणाला मंदिर-मशीदच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर त्यांनी दिल्ली किंवा लखनऊला गेलं पाहिजे. अंसारी यांनी अयोध्यामध्ये आयोजित धर्मसभा ही फक्त गर्दी जमा करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, अयोध्ये ऐवजी विधानभवन किंवा संसदेल घेरलं पाहिजे. पण अयोध्येतील लोकांना व्यवस्थित जगू दिलं पाहिजे.'
जफरयाब जीलानी
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे वरिष्ठ सदस्य आणि प्रवक्ते जफरयाब जीलानी यांनी म्हटलं की, अयोध्येत विश्व हिंदू परिषदने आयोजित केलेली धर्मसभा ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती आहे. तेथील मुसलमान यामुळे घाबरला आहे. जीलानी यांनी म्हटलं की, 'ज्या लोकांना अयोध्येत असुरक्षित वाटत आहे अशा लोकांनी लखनऊला यावं. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत.'
खालिद राशिद फरंगीमहली
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य खालिद राशिद फरंगीमहली यांनी म्हटलं की, छोट्या मुलांदेखील वाटतं आहे की देशात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत याचा राजकीय फायदा घेता येईल. सरकार आणि प्रशासनाची ही जबाबदारी आहे की, अयोध्येत सामान्य लोकांना सुरक्षा द्यावी. 1992 सारख्या घटनेची पुनर्रावृत्ती होऊ नये. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा नको.'
वसीम रिजवी
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी म्हटलं की, अयोध्येत लोकांची गर्दी पाहून मुस्लीम देखील घाबरले आहेत., सरकार आणि प्रशासनाने विचार केला पाहिजे की, इतक्या मोठ्या प्रमाणात का गर्दी केली जात आहे. यामुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.