समीर वानखेडे एनसीबी मुख्यालयात दाखल, वानखेडेंच्या समर्थनार्थ दिल्लीकर रस्त्यावर

पंच प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर एनसीबीने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे

Updated: Oct 26, 2021, 01:36 PM IST
समीर वानखेडे एनसीबी मुख्यालयात दाखल, वानखेडेंच्या समर्थनार्थ दिल्लीकर रस्त्यावर title=

नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. आर्यन खानचं (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला होता. 

या प्रकरणाची एनसीबीने गंभीर दखल घेतली असून समीर वानखेडे यांची एनसीबीकडून अंतर्गत चौकशी (vigilance inquiry)होणार आहे. दिल्लीतल्या मुख्यालयात समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे. वानखेडे यांची पदावरुन बदली होऊ शकते अशी चर्चाही रंगली आहे. 

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. एनसीबी मुख्यालयासमोर येऊन दिल्लीकरांना समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. Say No Drugs म्हणत दिल्लीकरांनी ड्रग्ज रॅकेटचा बीमोड करण्याची मागणी केली आहे. तसंच नवाब मलिक विरोधात पोस्टरबाजी करून वानखेडेच्या पाठीशी उभं असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही अेक आरोप लावले आहेत. यानंतर काल रात्री समीर वानखेडे तातडीने दिल्लीला रवाना झाले.