Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या या शेअरला तुफान नफा; ब्रोकरेजचा गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला

Multibagger Stock:  रशिया युक्रेन युद्धादरम्यान शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली होती. अनेक शेअर्स घसरले होते. परंतू त्यातही आयटी सेवा देणारा हा शेअर चांगली तेजी नोंदवत होता.

Updated: Apr 12, 2022, 02:26 PM IST
Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या या शेअरला तुफान नफा; ब्रोकरेजचा गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला title=

मुंबई : TCS Stock Price Today: जागतिक बाजारपेठेत सातत्याने घसरणीचे सत्र सुरू आहे. मात्र, भारतीय बाजारावर याचा फारसा परिणाम झाला नाही. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. तरीदेखील काही शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून दिले. आयटी सेवा कंपनी TCS च्या शेअर्समध्येही जबरदस्त वाढ झाली आहे. या शेअरमध्ये आजही तेजी दिसून येत आहे. ब्रोकरेज हाऊसेसनेही टीसीएसच्या स्टॉकला पसंती दिली आहे.

TCS ने कंपनीच्या प्रति इक्विटी शेअरमध्ये 22 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 

बाजार एक्सपर्ट्सचा सल्ला

टीसीएस कंपनीचा नफा झपाट्याने वाढत आहे. बाजारातील घसरणीच्या वातावरणातही ती 7.5 टक्के वार्षिकी वाढ नोंदवण्यात आली आहे. असे असले तरी या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसने संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजेच काही ब्रोकरेज हाऊसने या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

काही ब्रोकरेज हाऊसेस आहेत जे या स्टॉकबद्दल तटस्थ आहेत. यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या अशा ब्रोकरेज हाऊसेसचे म्हणणे आहे की, आयटी क्षेत्रातील मागणी आणि ही कंपनी मार्केट लीडर असल्याने निश्चितच फायदा होईल.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरमध्ये गुंतवणुकीची सल्ला देत, 4240 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. सध्याची किंमत 3696 रुपये आहे. म्हणजेच सध्याच्या किंमतीवरून शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतात. 

4Q FY22 मध्ये कंपनीचा महसूल6700 दशलक्ष डॉलर इतका होता. जो तिमाही आधारावर 3.2 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा निव्वळ नफा देखील अपेक्षेप्रमाणे सुमारे 9926 कोटी रुपये इतका आहे.