Share Market: 12 रुपयांचा शेअर 1200 पर्यंत पोहोचला; 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या पडझड होत असली तरी आगामी कालावधीमध्ये ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देईल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Updated: Mar 15, 2023, 05:04 PM IST
Share Market: 12 रुपयांचा शेअर 1200 पर्यंत पोहोचला; 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल! title=
share price jumps from 12 rs to 1200 rs

Share Market News: फार्मा म्हणजेच औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अंजता फार्माने (Ajanta Pharma) मागील काही काळापासून गुंतवणुकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. आज म्हणजेच 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये गडगडल्याचं दिसत असलं तरी लाँग टर्मच्या दृष्टीने ही कंपनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर ठरली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अंजता फार्माच्या शेअर्सची किंमत अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1.1 टक्क्यांची घसरण झाली असून हा शेअर आजचं कामकाज संपलं तेव्हा 1,191 च्या दरावर होता. अजंता फार्माच्या स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात 1 कोटींचे रिटर्न्स दिले आहेत.

12 रुपयांना होते शेअर्स

अजंता फार्माचे शेअर्स 29 जानेवारी 2010 रोजी 12.14 रुपये प्रति शेअर या दराला होते. सध्या या शेअर्सची किंमत 1200 रुपये इतकी आहे. मागील वर्षभरातील या शेअर्सच्या उच्चांकी भावाबद्दल सांगायचं झाल्यास या शेअर्सने 1427.50 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. मागील वर्षभरातील सर्वात कमी म्हणजे 1061.77 रुपयांपर्यंत या शेअर्सचा दर घसरला होता. अजंता फार्माचे शेअर्स मागील 5 दिवसांमध्ये 3.97 टक्क्यांनी घसरले आहेत. मागील एका महिन्यामधील पडझड ही 2.10 टक्के इतकी आहे. तर 6 महिन्यांमधील घसरण ही 8.52 टक्के इतकी आहे.

निच्चांक स्तरही गाठला

29 जानेवारी 2010 पासून या शेअर्सच्या स्टॉक्समधील उलाढाल पाहिल्यास ती 100 टक्के इतकी आहे. म्हणजेच मागील 13 वर्षांमध्ये हा शेअर 10 हजार टक्क्यांनी वधारला आहे. म्हणजेच 2012 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीने 1 कोटींचे रिटर्न्स दिले आहेत. हा शेअर 11 मे 2022 रोजी आपल्या सर्वात निच्चांकी स्तरावर म्हणजेच 1062.73 रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर 4 महिन्यांमध्ये या शेअरची किंमत 34 टक्क्यांनी वधारली. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 1425.80 पर्यंत पोहोचला. त्यानंतर अजंताच्या शेअर्समध्ये पडझड सुरु झाली.

शेअर्सची किंमत वाढणार

बाजारातील जाणकारांच्या अंदाजानुसार येणाऱ्या कालावधीमध्ये हा शेअर आपल्या सध्याच्या दरांपेक्षा 16 टक्के अधिक कमाई करेल. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 15,512 कोटी रुपयांहून अधिक आहे. मागील 2-3 वर्षांपासून ही कंपनी आपला नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करत अशून भारताबरोबरच आशिया आणि आफ्रिकेतचील देशांमध्ये जेनेरिक्स औषधांच्या क्षेत्रातील विस्तार वाढवताना दिसत आहे.