Multibagger stock 2022 : टाटा, बिर्ला ग्रुपच्या दोन शेअर्सकडून पैशांचा पाऊस, वर्षभरात २७००% रिटर्न्स

गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी 

Updated: Jan 10, 2022, 05:08 PM IST
Multibagger stock 2022 : टाटा, बिर्ला ग्रुपच्या दोन शेअर्सकडून पैशांचा पाऊस, वर्षभरात २७००% रिटर्न्स title=

मुंबई : Multibagger stock 2022: २०२१ मध्ये शेअर बाजारात अनेक चढ-उतार आले. अशा परिस्थितीतही मार्केटने अनेक रेकॉर्ड बनवले. अनेक शेअर्स नव्या वर्षातही जबरदस्त रिटर्न्स मिळवून देत आहेत. याच दरम्यान टाटा आणि बिर्ला ग्रुपचे दोन स्टॉकने आपल्या गुंतवणकदारांना मालामाल केलं आहे. 

या दोन कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांवर (High Return Stock 2022) पैशांचा पाऊस पाडला आहे. अगदी एक वर्षाच्या आत या दोन्ही शेअर्सने गुंतवणूकदारांना २७००% हून अधिक रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 

TTMLच्या शेअरने दिले छप्पर फाड रिटर्न 

टाटा समूहाची Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) मुंबईत दूरसंचार आणि क्लाउड सेवा पुरवते. त्याच्या स्टॉकने फक्त एका वर्षात 2,714.97% परतावा म्हणजेच रिटर्न्स मिळवून दिले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीचे शेअर्स एका वर्षापूर्वी फक्त 9.35 रुपयांवर होते. तर शुक्रवारी हा शेअर २६३.२० रुपयांवर बंद झाला.

Xpro India चा जबरदस्त परफॉर्मन्स 

Xpro इंडिया ही बिर्ला समूहाची एक छोटी कंपनी आहे. जी रेफ्रिजरेटर्ससाठी लाइनर्स आणि कॅपेसिटरसाठी पॅकेजिंग साहित्य तयार करते. बिर्ला समूहाच्या पॉलिमर प्रोसेसिंग कंपनी Xpro इंडियाच्या शेअर्सने एका वर्षात 2,743.40% रिटर्न्स दिले आहेत.

एक वर्षापूर्वी या कंपनीचा स्टॉक 38.25 रुपयांवर होता. तर शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर शेअरची किंमत  1,087.60 रुपयांवर पोहोचली. हे प्रामुख्याने रेफ्रिजरेटर्ससाठी लाइनर आणि कॅपेसिटरसाठी पॅकेजिंग साहित्य तयार करते.

दोन्ही शेअर्स बुलीश 

तज्ज्ञांच्या मते या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये अजूनही तेजी आहे. या दोन्ही शेअर्सनी आतापर्यंत बंपर परतावा दिला असून तो आणखी वाढू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन्ही कंपन्यांचे बॅलेन्स शीट अतिशय मजबूत आहे.

TTML एक पेनी स्टॉक आहे, तर Xpro इंडिया स्‍माल कॅप कंपनी आहे. साधारणपणे या प्रकारच्या स्टॉकमध्ये बरीच अस्थिरता दिसून येते. अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सल्लागाराचा सल्ला घ्यावा.