Multibagger Stock | 10 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर पोहचला 1680 रुपयांवर; तुम्ही घेतला का?

या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते तर, आज 1.70 कोटी रुपये झाले असते

Updated: Oct 20, 2021, 03:53 PM IST
Multibagger Stock | 10 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर पोहचला 1680 रुपयांवर; तुम्ही घेतला का? title=

मुंबई : शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 61 हजाराच्या वर पोहचला आहे. मागील वर्षभरात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. असाच एक एचडीएफसी बँकेचा शेअर सध्या ऐतिहासिक उच्चांकीवर आहे. हा शेअर 1725 रुपयांवर ट्रेड करीत आहे. अजूनही हा शेअर 1800 रुपयांवर पोहचण्याची शक्यता आहे. 
 
 HDFC Bank चा शेअर 
 एचडीएफसी बँकेच्या शेअरने मागील एका महिन्यात 8 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. तसेच मागील 6 महिन्यात 1412 रुपयांनी वाढून 1680 रुपयांवर पोहचला आहे. 
 
 शेअरचा इतिहास
 एचडीएफसी बँकेच्या शेअरचे मुल्य 22 वर्षापूर्वी 9.80 रुपये प्रति शेअर इतके होते. जर गुंतवणूकदाराने 9.80 रुपये प्रति शेअऱ किंमतीवर त्यावेळी 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते तर, आज 1.70 कोटी रुपये झाले असते. 
 
 आऊटलूक
 शेअऱ बाजारातील एक्सपर्टच्या माहितीनुसार एचडीएफसीचे शेअरमध्ये आणखी तेजी येऊ शकते. या शेअरमध्ये 1750 ते 1800 रुपयांच्या शॉर्ट टर्म टार्गेटसह गुंतवणूक करता येऊ शकते.