मुंबई : प्रवाशांसाठी सेवा सुधारण्यासाठी कंपनीला अलीकडेच मोठ्या संस्थात्मक ग्राहकांकडून 1,500 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यानंतर सलग पाच दिवस बीएसईवर त्याचा स्टॉक अप्पर सर्किट दाखवत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा जोर आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय बाजारातून विक्रमी पैसे काढत आहेत. यानंतरही, असे काही शेअर्स आहेत ज्यांच्या किमती एकेकाळी खूपच कमी होत्या, परंतु त्यांनी बाजाराच्या अनिश्चिततेवर मात करून त्यांच्या गुंतवणूकदारांना बहुपर्यायी परतावा दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक म्हणजे क्रेसांडा सोल्युशन्स लिमिटेड (Cressanda Solutions Ltd) होय. ज्याने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 5200% परतावा दिला आहे.
सलग पाच दिवस अप्पर सर्किट
सध्या ही कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी कंपनीला अलीकडेच मोठ्या संस्थात्मक ग्राहकांकडून 1,500 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यानंतर सलग पाच दिवस बीएसईवर त्याचा स्टॉक अप्पर सर्किट दाखवत आहे. आजपासून फक्त एक वर्षापूर्वी, त्याच्या शेअरची किंमत फक्त 61 पैसे होती, जी आता 32.15 रुपयांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे या समभागातील गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात सुमारे 5200 टक्के परतावा मिळाला आहे.
स्टॉकची उच्चांकावरून घसरण
हा स्टॉक अजूनही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून खाली आहे. गेल्या एका महिन्यात ते 44.60 रुपयांवरून जवळपास 28 टक्क्यांनी घसरले आहे. जर आपण या वर्षाबद्दल बोललो तर ते 6.79 रुपयांवरून सुमारे 375 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या समभागाची किंमत 4.07 रुपयांवरून 32.15 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच क्रेसंडा सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत या काळात सुमारे 700 टक्क्यांनी वाढली आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
या शेअरची किंमत ज्या पद्धतीने वाढत आहे. त्यानुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असते तर, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4.75 लाख रुपये झाले असते.
जर एखाद्याने वर्षभरापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्याकडे आता 53 लाख रुपये असतील.