सॅमसंगचा जबरदस्त 5G स्मार्टफोन येतोय, कमी किमतीत मिळतील उत्तम फीचर्स

सॅमसंग लवकरच भारतात Samsung Galaxy A13 5G फोन लॉन्च होत आहे. फोन कमी किमतीत जबरदस्त फीचर्स यात देण्यात आली आहेत. फोनमध्ये दमदार 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असेल. चला Samsung या नव्या मोबाईल बद्दल सर्वकाही जाणून घेऊ या...

Updated: Jun 2, 2022, 10:06 AM IST
सॅमसंगचा जबरदस्त 5G स्मार्टफोन येतोय, कमी किमतीत मिळतील उत्तम फीचर्स title=

मुंबई : Samsungचा तगडा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होत आहे. Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आता सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर आगामी Samsung Galaxy A13 5G चे सपोर्ट पेज दाखवण्यात आले आहे.  Galaxy A13 5G ने डिसेंबर 2021मध्ये यूएस मार्केटमध्ये जागतिक पदार्पण केले. अलीकडे, Galaxy A13 5G ची युरोपियन आवृत्ती Google Play Console डेटाबेसवर दिसली. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर Galaxy A13बाबत दुजोरा मिळाला आहे. याचा हँडसेटच्या भारतीय प्रकारात मॉडेल क्रमांक SM-A136B असेल, जो युरोपात लॉन्च करण्यात आलेल्या फोन प्रमाणे असणार आहे.

Samsung Galaxy A13 5G Price In India

Samsung Galaxy A13 5G

Samsung Galaxy A13 5G ची भारतात किंमत किती असेल याची उत्सुकता आहे. Galaxy A13 5G च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत यू एस डॉलर $250 (सुमारे 19,400 रुपये) आहे. आधीच्या रिपोर्टनुसार, 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत युरोपमध्ये 209 युरो (अंदाजे रु. 17,400) असेल. त्याचवेळी, हँडसेटच्या 4GB + 128GB वेरिएंटची किंमत 239 युरो (सुमारे 19,900 रुपये) सांगितली जात आहे.

Samsung Galaxy A13 5G Specifications

Samsung Galaxy A13 5G 90Hz रिफ्रेश रेट, 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्याता आला आहे. हुड अंतर्गत, Galaxy A13 5G मध्ये एकात्मिक Mali G57 GPU सह ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर या फोनमध्ये असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा

Samsung Galaxy A13 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक शूटरचा समावेश आहे. गॅलेक्सी उपकरणावरील उच्च-रिझोल्यूशन सेन्सर 2MP मॅक्रो, 2MP डेप्थ सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह उपलब्ध आहे. सेल्फीसाठी Galaxy A13 5G 5MP कॅमेरा असणार आहे.

Samsung Galaxy A13 5Gची बॅटरी क्षमता

Samsung Galaxy A13 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी हँडसेटमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हे पॉवर बटण म्हणून देखील वापर होतो. त्याचे वजन 195 ग्रॅम आणि 164.5 x 76.5 x 8.8 मिमी आहे.