High Return Stocks | SBI, Infosys सह 'हे' दमदार स्टॉक देतील छप्परफाड पैसा

Multibagger penny stock: जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक्सचा समावेश करायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स घेऊन आलो आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने काही शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Updated: Feb 21, 2022, 12:31 PM IST
High Return Stocks |  SBI, Infosys सह 'हे' दमदार स्टॉक देतील छप्परफाड पैसा title=

नवी दिल्ली : Multibagger Penny Stocks/Stocks to buy: : तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले फंडामेंटल असलेले स्टॉक हवे असतील. तर आम्ही तुमच्यासाठी काही दमदार स्टॉकची (Stocks To Buy Today) यादी घेऊन आलो आहोत. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने काही दमदार स्टॉकवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्तिर वातावरण आहे. त्यामुळे चांगले फंडामेंटल असलेले शेअर दीर्घकाळासाठी दमदार परतावा देऊ  शकतात. त्यामध्ये SBI, Infosys, Maruti आणि Jubilant Food works सामिल आहेत. (High Return stock today) 

State Bank of India

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. यासाठी लक्ष्य 725 रुपये इतके ठेवण्यात आले आहे. या प्रकारे सध्याच्या म्हणजेच 515 रुपयांच्या किंमतीवरून 41 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

Jubilant Foodworks ltd

मोतीलाल ओसवालने जुबलिएंट फूडवर्क्सच्या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 4200 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याप्रकारे सध्याच्या किंमतीवरून म्हणजेच 2999 रुपयांवरून 1200 रुपयांचा नफा मिळू शकतो. ही लक्ष्य किंमत साध्य झाल्यास 40 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

Infosys Ltd

इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर्सवर मोतीलाल ओसवालने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रतिशेअर लक्ष्य 231.0 रुपये ठेवण्यात आले आहे. या शेअरची सध्याची किंमत 1705 रुपये आहे. दिलेल्या लक्ष्य प्रमाणे 604 रुपये प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

Maruti Suzuki India Ltd

मोतिलाल ओसवालने मारूती सुजुकी इंडिया लिमिटेडमध्ये शेअर्सच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 10300 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या या शेअरची किंमत 8500 रुपये आहे.