मुंबई : शेअर बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली आहे. गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. कोविड 19 च्या संसर्गानंतरही या शेअर्समध्ये तेजी कायम राहिली आहे. असाच एक शेअर आहे अवंती फिड्स! 9 सप्टेंबरला शेअरचा भाव 558.95 रुपयांवर बंद झाला होता. ब्रोकरेज फर्म अजूनही या शेअरवर बुलिश आहेत. ते यामध्ये खरेदीचा सल्ला देत आहेत. ICICI securities ने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.
रिटर्न मशीन शेअर
अवंती फिड्सच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 10 वर्षात कंपनीच्या शेअरने 111 पट रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाउस अजुनही या शेअरवर बुलिश आहेत. 10 वर्षापूर्वी या शेअरचा भाव 5 रुपये होता. आता वाढून तो 558 रुपये झाला आहे.
ब्रोकरेज हाऊसने दिला खरेदीचा सल्ला
ICICI securitiesने नुकतेच अवंती फिड्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ICICI securitiesने एका वर्षासाठी 637 रुपयांचे टार्गेट दिले आहे. शेअर हे टार्गेट पूर्ण करू शकल्यास गुंतवणूकदारांना 20 टक्के रिटर्न मिळू शकतो.
39 जूनच्या तिमाही निकालात कंपनीचे इनकम 28 टक्क्यांनी वाढून 1430 कोटी झाले आहे. मागील तिमाहीमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 1116.37 कोटी रुपये राहिले आहे. मागील वर्षी जून तिमाहीच्या तुलनेत हे उत्पन्न 45 टक्क्यांनी वाढले आहे. जून 2021 तिमाहामध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 79.21 कोटी रुपये होता.
कंपनीचा व्यवसाय
अवंती फिड्स लिमिटेडची स्थापना 1993 मध्ये झाली होती. ही एक मिडकॅप कंपनी आहे. अवंती फिड्स प्रॉन आणि फिश फिड्सची लिडिंग निर्माती कंपनी आहे. भारताएवजी हे प्रोडक्ट इतर देशांमध्येही एक्स्पोर्ट करण्यात येतात.