मुंबई : देशाचे सर्वात लोकप्रिय उद्योगजक आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे उद्योग क्षेत्रात कायम चर्चेत असतात. यावेळी मात्र सर्वत्र चर्चा रंगलीये ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मोठा मुलगा आणि रिलायंस जिओचे चेअरमन आकाश अंबानीची (Akash Ambani). सर्वात महत्वाचं म्हणजे या चर्चेचं कारणही तितकचं कमालीचं आहे.
जगभरात लोकप्रिय असलेलं टाईम्स मॅगझिन हे जगातील उभरत्या स्टार्सची यादी बनवते जिचं नाव ‘Time100 Next’ असं आहे. या यादीमध्ये आकाश अंबानीचंही नाव आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे टाईम्सच्या या यादीमध्ये आकाश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत.
'बिझनेस वाढवण्यासाठी आकाश प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांनी Google आणि Facebook सोबत अरबों डॉलर रक्कमेची महत्वपूर्ण डील पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.' असं मत टाईम्स मॅगझिनने ‘Time100 Next’ यादीत आपलं स्थान मिळवलेल्या आकाश अंबानीबद्दल नोंदवलं आहे.
जगभरातील उभरत्या लीडर्सच्या कॅटेगरीमध्ये आकाश अंबानीने स्थान मिळवल आहे. टाईम्स मॅगझिनच्या मते,' वयाच्या 22 व्या वर्षी आकाश अंबानीने जिओ कंपनीच्या बोर्डमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. या वर्षीच्या जून महिन्यात आकाशकडे भारतील सर्वात मोठी दुरसंचार कंपनी असलेली जिओचा कारभार आकाश अंबानीकडे सोपवण्यात आला. तब्बल 42 कोटी 60 लाख ग्राहक असणारी रिलायंस जिओ कंपनीची जबाबदारी चेअरमन आकाश अंबानीकडे आहे.
रिलायंस जिओ (Reliance Jio) कंपनीचं 5G रोलआऊट आकाश अंबानींच्या नेतृत्वात सुरु आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत मुंबई आणि दिल्ली प्रमाणेच इतर काही मेट्रो सिटीजमध्ये (Metro Cities) 5G सर्विस लॉंच करण्याची योजना कंपनीद्वारे राबवली जाणार असल्याची चर्चा आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात (Indian Telecom Sector) जिओ ही अशी एकमेव कंपनी आहे, जिने 700 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रम बँड खरेदी केलं आहे. असा दावा केला जातोय की, हा एकमेव स्पेक्ट्रम बँड आहे, ज्यावर स्टँड-अलोन 5G नेटवर्क अर्थात True 5G चालू शकेल.
टाईम्स मॅगझिनद्वारे प्रत्येकवर्षी ‘Time100 Next’ ही यादी प्रकाशित केली जाते. या यादीमध्ये जगभरातील 100 उगवत्या नेतृत्वांसोबतच इतर क्षेत्रातील स्टार्स यादी प्रकाशित केली जाते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Time100 Next’ यादीमध्ये संगीतकारांसोबतच मेडिकल प्रोफेशनल्स सरकारी आधिकारी, आंदोलनकर्ते, हाय-प्रोफाईल व्हिसल-ब्लोअर्स आणि टॉप सीईओंचा देखील समावेश आहे.