मुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई'

अंबानींच्या सूनेचा आनंद गगनात मावेना...   

Updated: Oct 10, 2022, 10:46 AM IST
मुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई' title=
Mukesh Ambani daughter in law Shloka mehta sister diya mehta welcomes baby boy

Shloka Mehta : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या नावांपैकी एक, म्हणजे मुकेश अंबानी (Mukesh Ambani). सध्या अंबानी कुटुंबात पुन्हा आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबाची थोरली सून, श्लोका मेहता अंबानी (Shloka Mehta Ambani) यावेळी या आनंदाचं थेट कारण ठरत आहे. 2019 मध्ये श्लोकानं अंबानींचा मुलगा आकाश अंबानी याच्याशी लग्न केलं. मुलगा पृथ्वी याच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंब पूर्ण झालं. 2020 मध्ये श्लोका आणि (Akash Ambani) आकाश आई-बाबा झाले. पृथ्वीच्या येण्यानं अंबानींच्या घराचं गोकुळ झालं. आता तोच पृथ्वी मोटा भाई झाला आहे. (Mukesh Ambani daughter in law Shloka mehta sister diya mehta welcomes baby boy)

ही गोड बातमी अंबानींच्या घरातून असली, तरी ती श्लोकानं नव्हे तर तिच्या बहिणीनं दिली आहे. दिया मेहता जटिया या श्लोताच्या बहिणीनं एप्रिल 2022 मध्ये दुसऱ्या गरोदरपणाची बातमी दिली होती. तेव्हापासूनच लहानग्या पृथ्वीला आपल्या Junior ला पाहण्याची उत्सुकता होती. 

अखेर तो क्षण आला आणि पृथ्वीला लहान भाऊ मिळाला. श्लोकाच्या बहिणीनं काही दिवसांपूर्वीच एक इन्स्टा पोस्ट लिहित स्वत:चा सुरेख फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती पायघोळ गाऊन घालत बेबी बम्प फ्लाँट करताना दिसत आहे. एखाद्या राणीच्या थाटात बसत काढलेला हा फोटो पाहताना 'ब्रिजटनच्या लेडी व्हिसलडाउन' सारखं वाटतंय असं तिनंच लिहिलं. आपल्या मुलाचा जन्म 2 ऑगस्ट 2022 ला झाल्याची गोड बातमी तिनं इथं दिली. 

अधिक वाचा : Indian Idol मध्ये ज्याला नाकारलं, तोच आता बनला सोशल मीडिया स्टार, लोकांनी उचलून धरलं

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Diya Mehta Jatia (@dmjatia)

लाडक्या मावशीला बाळ झाल्यामुळं आता पृथ्वी मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबातही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अद्यापही या बहुचर्चित कुटुंबातल्या छोट्या सदस्याचे कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत. पण, दियाच्या फोटोवरच समाधान मानत नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.