Mukesh Ambani: अंबानींचे मुलं लाइफस्टाइलवर करतात करोडोंचा खर्च...

Nita Ambani : अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीचा असा नमुना पाहायला मिळतो, जो सर्वांना प्रभावित करतो. आज आपण ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेऊयात...  

Updated: Oct 19, 2022, 05:53 PM IST
Mukesh Ambani: अंबानींचे मुलं लाइफस्टाइलवर करतात करोडोंचा खर्च... title=
Mukesh Ambani and Nita Ambani children lifestyle nmp

Ambani children lifestyle : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या (Top 10 Rich)  यादीत त्यांची गणना होते. मुकेश अंबानी आणि निता अंबानी  (Nita Ambani)  यांनी दिवाळीची (Diwali 2022) तयारी जोरदार सुरु केली आहे. सर्वात मोठी आणि महागडी दिवाळी पार्टीचं आयोजन दरवर्षी मुकेश अंबानी यांच्याकडे होते असते. मुकेश आणि निती अंबानी यांच्या मुलांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, यात वेगळं काही सांगायची गरज नाही. अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंटने (Radhika Merchant) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Mumabi Jio World Center) आयोजित केलेल्या अरंगेत्रम सोहळ्याचे आयोजनही चर्चेत होते.

पण या मुलांची लाइफस्टाइल (Lifestyle) कशी असले हे अनेकांना जाणून घ्यायला आवडतं. अंबानी कुटुंबात वेळोवेळी होणाऱ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपत्तीचा असा नमुना पाहायला मिळतो, जो सर्वांना प्रभावित करतो. आज आपण ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेऊयात... (Mukesh Ambani and Nita Ambani children lifestyle nmp)

ईशा अंबानीची लाइफस्टाइल (Isha Ambani's Lifestyle)

2018 मध्ये ईशा अंबानीचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 720 कोटी रुपये अंबानी कुटुंबाने त्यांच्या लग्नात खर्च केले होते. लग्नानंतर ईशा पती पिरामलसोबत वरळी येथील गुलिता नावाच्या बंगल्यात राहते. या बंगल्याची किंमत 2012 मध्ये सुमारे $ 10 बिलियन किंवा सुमारे 450 कोटी रुपये होती, जो ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामल यांनी त्यांच्या सुनेला लग्नात भेट म्हणून दिला होता. अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर यूएसएच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यासात बॅचलर पदवी पूर्ण केली आहे. आई-वडिलांशिवाय ईशा अंबानीची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 700 कोटी एवढी आहे. 

आकाश अंबानीची लाइफस्टाइल (Akash Ambani's Lifestyle)

ईशा अंबानीचा जुळा भाऊ आकाश अंबानी हा मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आहे. आकाश अंबानी यांनी धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केलं आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात गेले. आकाश अंबानीला खेळाची खूप आवड आहे. त्याने प्रसिद्ध खेळाडूंच्या जर्सी आणि बॅटचा संग्रह केला आहे. 2019 मध्ये आकाश आणि श्लोकाचं लग्न झालं. 27 मजली अँटिलियामध्ये तो पत्नीसोबत राहतो. आकाश अंबानीला वाहनांची खूप आवड आहे, त्याच्याकडे जगातील सर्वात महागडी कार बेंटले बेंटेगा, रेंज रोव्हर वोग आणि रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप आणि बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सीरीजची अनेक वाहने आहेत. आकाश रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उच्च पदावर आहे आणि कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प हाताळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Ambani (@akashambanii)

अनंत अंबानीची लाइफस्टाइल (Anant Ambani's Lifestyle)

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने आपल्या भावंडांप्रमाणेच सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी स्कूलमधून केलं आणि त्यानंतर आइसलँडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच अनंत अंबानींना दम्याचा त्रास होता. औषधांमुळे त्यांचं वजन खूप वाढलं होतं. 108 किलो वजनाच्या अनंतने अवघ्या 18 महिन्यांत आपले वजन कमी करून सर्वांना चकित केले होते. दादा धीरूभाई अंबानी (Dada Dhirubhai Ambani) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनंत अंबानी यांचं भाषण चांगलेच व्हायरल झालं होतं. अनंत अंबानी हे त्यांची आई नीता अंबानी यांच्यासह मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सह-मालक आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (Bandra Kurla Complex) बांधलेल्या ओबेरॉय हॉटेलने आपल्या हॉटेलचे नाव अनंत अंबानी यांच्या नावावर ठेवले आहे. हॉटेल ओबेरॉय अनंत विलास असं त्याचं नाव आहे. 2020 च्या अहवालानुसार, अनंत अंबानींची एकूण संपत्ती $73.8 अब्ज आहे.