मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 29, 2023, 02:24 PM IST
मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार  title=

Muharram Procession Accident: मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौघांचा मृत्यू

या घटनेनंतर परीसरात एकच हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. लोक ताजियाला इमाम बडा येथे हलवणार होते. त्यादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये आसिफ रझा (21), इनामुल रब (35), गुलाम हुसेन आणि साजिद अन्सारी (18) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सलुद्दीन अन्सारी, इब्राहिम अन्सारी, लाल मोहम्मद, फिरदौस अन्सारी, मेहताब अन्सारी, आरिफ अन्सारी, मोजोबिल अन्सारी आणि साकिब अन्सारी आणि अन्य एकाचा समावेश आहे.

ताजिया हाय टेंशन लाइनला धडकला

BGH बोकारोमध्ये सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. ताजिया उचलत असताना वरून जाणाऱ्या हाय टेंशन लाइनला धडक बसली. त्यामुळे ताजिया मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला आणि अपघात झाल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले., त्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गटविकास अधिकारी पेटरवार शैलेंद्र चौरसीसा हेही घटनास्थळी पोहोचले.

13 जण गंभीररीत्या भाजले

ताजियापासून 11 हजार हाय टेंशन वायर वेगळी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात 13 जण गंभीररित्या भाजले. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे मोहरमपूर्वी सर्व पोलीस ठाणे परिसरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोहरम शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्यावर चर्चा झाली, मात्र सर्व बैठका निष्फळ ठरल्या आणि आज मोठी दुर्घटना घडली.

मिरवणूक काढणाऱ्यांचे दुर्लक्ष होते की विद्युत विभाग, प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता?  अखेर या चार मृत्यूला जबाबदार कोण? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. सर्व प्रकरणांच्या तपासानंतरच याची माहिती मिळेल. मात्र थोडासा निष्काळजीपणा अनेकांचा जीव घेऊ शकतो हे या घटनेतून दिसून आले आहे.