Shah Jahan And Mumtaz Mahal Story : प्रेमाच प्रतिक ताजमहाल हे बादशाह शाहजहानने राणी मुमताजसाठी बांधलं होतं. शाहजहान आणि मुमताज यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, हे सर्वांना माहितीय. पण मुमताज यांचा प्रसूतीदरम्यान गोंधळामुळे वेदनादायी निधन झालं. त्यामुळे मुमताज यांच्या आठवणीत शाहजहान यांनी ताजमहाल बांधले. मुमताज महाल यांच्या निधनानंतर शाहजहान यांचं काय झालं. त्यांनी लग्न केलं की नाही याबद्दल तुम्हाला माहितीये का? तर इतिहासकार सांगतात की, शाहजहान यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल चार लग्न केले होते. मुमताजच्या आधीही त्यांची एक पत्नी होती.
पहिली पत्नी कोण होती?
शाहजान आणि मुमताज यांचा सगाई झाल्यानंतर कंदहारी बेगमशी शाहजानचं लग्न झालं. कंदहारी बेगम ही पर्शियाची राजकन्या होती. सुलतान मुझफ्फर हुसैन मिर्झा यांची सर्वात धाकटी मुलगी, शाहजहान आणि कंदाहारी यांचा विवाह 12 डिसेंबर 1609 रोजी झाला.
अर्जुमंद बानो (मुमताज महल) बेगम - शाहजहानला त्याची दुसरी बेगम मुमताज महल खूप प्रिय होती. मुमताज महल आणि शाहजहान यांची 1607 मध्ये सगाई झाली आणि पाच वर्षांनी 1612 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यावेळी मुमताज 19 वर्षांची होती. आगराच्या मीना बाजारच्या गल्लीत शाहजहानने अर्जुमंदला पहिल्यांदा पाहिलं होतं असं म्हणतात. तेव्हा शाहजान मुमताज यांना पाहतच राहिले. तिच्या सौंदर्यामुळे शाहजहान पहिल्याच नजरेत राणीच्या प्रेमात पडले. मुमताज यांनी 13 मुलांना जन्म दिला पण 14व्या मुलाच्या जन्मावेळीच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचं वय 39 वर्षे होतं.
अकबराबादी महल ही शाहजहानची चौथी पत्नी होती. 2 सप्टेंबर 1617 रोजी शाहजहान तिच्याशी लग्न केलं होतं. अकबराबादी महलने जून 1619 मध्ये सुलतान जहाँ अफरोज मिझरा या मुलाला जन्म दिला आणि मार्च 1621 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
याशिवाय शाहजहानला हसीना बेगम, मुती बेगम, कुदसियान बेगम, फतेहपुरी महल, सरहिंदी बेगम, कंदहारी बेगम अशा अनेक बायका होत्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ताजमहालमध्ये फक्त मुमताजच नाही तर आणखी तीन बायका पुरल्या आहेत. पूर्वेकडील दरवाजावर इज्जुनिशन बेगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरहिंदी बेगमची कबर आहे. पश्चिम दरवाजावर फतेहपुरी बेगमची कबर आहे, याशिवाय चौथी बेगम खंडारी बेगम यांची कबर ताजच्या बाहेर आहे, असं इतिहासकारक सांगतात.