Cheetah Project : मध्य प्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कात (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा (Cheetah) मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. आतापर्यंत सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. मार्चनंतर मृत्यू पावलेला हा सहावा चित्ता आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) वन विभागाने याबाबत निवेदन जारी करत माहिती दिली आहे.
मध्यप्रदेश वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी एक मादी चित्ता मृत अवस्थेत सापडला. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर चित्त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. आता सहा मादी चित्तापैकी एक चित्ता पिंजऱ्यात ठेवण्यात आला आहे. तर जंगलात सोडण्यात आला असून त्याच्यावर वन विभागातर्फे नजर ठेवली जात आहे. जंगलातील मादी चित्त्याला आरोग्य तपासणीसाठी पुन्हा पिंजऱ्यात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
एका महिन्यात तीन चित्त्यांचा मृत्यू
कूनो नॅशनल पार्कात 26 जूनला आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. या चित्त्याचं नाव 'सूरज' असं होतं. त्यानंतर 11 जुलैला 'तेजस' नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. तेजस चित्त्याच्या मानेवर जखमेचे निशान आढळले होते. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेजस आणि सूरजमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसक लढाई झााली होती. या लढाईत तेसजच्या मानेवर जखमी झाल्या होत्या , मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. तर या लढाईत सूरजही गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचाही मृतदेह आढळून आला.
20 चित्ते आणले होते
कूनो नॅशनल पार्कात दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून 20 चित्ते आणण्यात आले होते. पण वेगवेगळ्या कारणाने यातल्या आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
चित्त्यांचा कशामुळे मृत्यू
नामिबियातून आणणलेल्या मादी चित्ता ज्वालाने 4 बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी 3 बछड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 26 मार्च 2023 ला नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता 'साशा'चा किडनी संग्रमणामुळे मृत्यू झाला. तर 23 एप्रिल 2023 मध्ये 'उदय' नावाच्या चित्त्याचा अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला. 9 मे 2023 ला 'दक्षा' नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. नर चित्त्यांबरोबर झालेल्या लढाईत 'दक्षा'चा जीव गेला. त्यानंतर 11 जुलै 2023 ला दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 'तेजस'नेही हिंसक लढाईत जीव गमावला.
परदेशातून आणलेल्या चित्त्यांचा एकापाठोपाठ मृत्यू होत आहे, पण सरकारने याबाबत कोणतीही ठोस योजना राबलेली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.