चिंताजनक ! देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 हजारांच्या वर

 24 तासांत कोरोनाचे 5 हजाराहून अधिक नवीन रुग्ण 

Updated: May 18, 2020, 11:45 AM IST
चिंताजनक ! देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 हजारांच्या वर title=

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 96 हजारांच्या वर गेली आहेत. 24 तासांत कोरोनाचे 5 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, देशात आता एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 196 झाली आहे. यापैकी 3 हजार 49 लोकांचा मृत्यू झाला असून 36 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथील रूग्णांची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 1198 वर पोचली आहे. त्याचबरोबर गुजरातमधील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार 379 पर्यंत पोहोचला आहे, तCourier Newर मृत्यू झालेल्यांची संख्या 659 आहे.

तामिळनाडूमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत येथे 11 हजार 224 रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. मंत्रालयाच्या अद्ययावत माहितीनुसार, दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 10 हजार 54 आहे, ज्यामध्ये 160 लोकांना मृत्यू झाला आहे.

राजस्थानमध्ये 5 हजार 202 रुग्ण असून 131 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात आतापर्यंत 4977 रुग्ण आढळले आहेत, ज्यात 248 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. येथे 4259 रुग्ण आढळले असून 238 लोकांचा बळी गेला आहे.