राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी

राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.

Updated: Jun 26, 2017, 07:20 PM IST
राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी title=

मुंबई : राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.
एक ऑक्टोबरपासून या गाड्यांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करू दिल्या जातील. जसे की कॅटरिंगसाठी ट्रॉली सेवा, युनिफॉर्म वेअर स्टाफ विनम्रपणे व्यवहार घडवून आणतील. याशिवाय, मनोरंजनाची सुविधादेखील दिली जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सणासुदीचा सीजन पाहता पर्यटकांच्या सोयीसुविधांना सोयीस्कर बनविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये १५ राजधानी आणि १५ शताब्दी गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वे गाड्यामध्ये बदल करण्यासाठी एकूण 25 कोटी रुपये खर्च केला जाईल. रेल्वे मंत्रालयाने ऑपरेशन 'स्वर्ण' लॉन्च केले आहे, ज्या अंतर्गत तीन महिन्यांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यात कोचचे इंटीरियर, टॉयलेट आणि विशेषत: स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जाईल.