Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग

Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग

Updated: Nov 1, 2022, 07:36 PM IST
Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग title=

Morbi Bridge Collapse : मोरबीमध्ये रविवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मच्छु नदीवरील पूल कोसळल्याने अपघात झाला. अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 300-400 लोक उपस्थित होते. पाण्यात पडल्यानंतर काहींनी पोहत नदी ओलांडली मात्र शेकडो लोकं नदीत बुडाले. ज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 135 जणांचा मृत्यू झालाय. एकीकडे मृत्यूचं तांडव सुरु होतं. पण यामध्ये एक होता नईम शेख ज्यांने जवळपास 60 लोकांचे जीव वाचवले. गुजरातच्या मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नईम शेख याने नदीत पोहून आपले व इतर काही लोकांचे प्राण वाचवले.

मच्छू नदीवर असलेला जवळपास 140 वर्ष जुना पूल अचानक कोसळला. त्यावेळी नईम देखील त्या पुलावर होता. त्याने सांगितले की, 'आमच्यापैकी 6 जण तिथे होतो, 5 परत आले आणि एकाचा मृत्यू झाला. मला पोहता येतं. मी आणि माझ्या मित्रांनी मिळून काही लोकांना वाचवले. हा एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात होता. मी लोकांना सुरक्षितपणे वाचवत असताना मला देखील दुखापत झाली.

आतापर्यंत 135 जणांचा मृत्यू

या अपघातानंतर पूल दुरुस्त करणाऱ्या कंपनीचे अधिकारी, तिकीट विक्रेते आणि सुरक्षा रक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली. आज सकाळी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. आतापर्यंत पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 135 वर पोहोचला आहे. अशी माहिती मोरबीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.