SBI-PNB-BoB सहीत सरकारी बँकांसंदर्भातील मोठी घोषणा! तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या तपशील

Moody's Rating: मागील बऱ्याच काळापासून भारतामधील एकाच सरकारी बँकेला यामध्ये चांगलं रेटिंग होतं मात्र आता अनेक बँकांचं रेटिंग सुधारल्याचं चित्र ताज्या अहवालामध्ये दिसून येत आहे. या संस्थेनं भारतीय बँकींग क्षेत्राबद्दल अनेक सकारात्मक भाकितं केली आहेत.

Updated: Jan 20, 2023, 05:16 PM IST
SBI-PNB-BoB सहीत सरकारी बँकांसंदर्भातील मोठी घोषणा! तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या तपशील title=
Moody upgrades ratings of PNB BoB Canara Bank

SBI-PNB-BoB Rating: स्टेट बँक ऑफ इंडिया (State bank of india), पंजाब नॅशनल बँकेबरोबरच (PNB) अनेक सरकारी बँकांसाठी (Government Banks) एक आनंदाची बातमी आहे. तुमचं सुध्दा खातं यापैकी एखाद्या सरकारी बँकेत असेल तर तुम्हाला ही गोष्ट ठाऊक असणे फारच आवश्यक आहे. 'एसबीआय', 'पीएनबी', 'कॅनरा बँक' (Canara Bank) आणि 'बँक ऑफ बडोदा'च्या (Bank of Baroda) रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली.

SBI चं रेटिंग काय?

'मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिस'ने (Moody's Investors Service) जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेचे डिपॉझिट रेटींग (bank deposit ratings) मागील काही काळापासून स्थिर असल्याचं म्हटलं आहे. 'मूडीज'ने 'एसबीआय'ला दिर्घकालीन स्थानिक आणि परदेशी मुद्रा बँक डिपॉझिट रेटिंग 'बीएएथ्री' (BAA3) कायम ठेवलं आहे. तर बाकी तीन सार्वजनिक बँकांचं दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

कॅनरा बँक आणि पीएनबीचं रेटिंग काय?

'एसबीआय'च्या दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंगला 'बीएएथ्री' (BAA3) असलं तरी आता बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक तसेच 'पीएनबी'सारख्या दीर्घकालीन बँक डिपॉझिट रेटिंग बीएएवन (BAA1) वरुन बीएएथ्री (BAA3) करण्यात आलं आहे. सार्वजनिक बँकांच्या डिपॉझिट रेटिंगमध्ये झालेली ही सुधारणा आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचं सूचित करते असं सांगितलं जात आहे. यामधून गरज पडल्यास या बँकांना उच्च पातळीवरी सरकारी मदत मिळू शकते असंही दर्शवलं जात आहे.

कर्जासंदर्भातील परिस्थिती सुधारली

'मूडीज बँक डिपॉझिट रेटिंग' कोणत्याची बँकेची परकीय आणि देशांतर्गत चलन आणि ठेवींसंदर्भातील बंधने वेळेवर पूर्ण करण्याची क्षमता दर्शवते. भारतामध्ये कर्जासंदर्भातील परिस्थिती हळूहळू सुधरत असून, किरकोळ कर्जासंदर्भात भारतीय बँकांनी बरीच सुधारणा केल्याचं 'मूडीज'ने म्हटलं आहे. भारतामधील कंपन्याची परिस्थिती अधिक सुधारलेली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या बँकांच्या मालमत्तेसंदर्भातील गुणवत्तेला धोका निर्माण करत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल

'मूडीज'ने भारताच्या आर्थिक विकासावर वाढत्या व्याजदरांबरोबरच जागतिक मंदीचा परिणाम होईल. मात्र भारतीय अर्थव्यवस्था इतर बाजारापेठांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करेल असं म्हटलं आहे. यामुळे बँकांसाठी सकारात्मक वातावरण तयार होईल असंही म्हटलं आहे.

सकारात्मक वातावरण

'मूडीज' रेटिंग एजन्सीने पुढील एक ते दीड वर्षांमध्ये बँकांची स्थिती आणि गुणवत्ता चांगली राहील. यामध्ये अनुकूल वातावरणाबरोबरच कंपन्यांच्या बाजूनेही सकारात्मक परिस्थिती असेल असं म्हटलं आहे.