Monkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर

 Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे.  

Updated: Aug 13, 2022, 09:24 AM IST
Monkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर title=

मुंबई : Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव झाला आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील दोन पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची पुष्टी झाली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 12 दिवसांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा नमुनाही घेण्यात आला. कुत्र्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि त्यातही मंकीपॉक्सची तीच लक्षणे दिसून आली जी दोघांना होती.

कोरोना विषाणूबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे तेथील सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. (Monkeypox Human to Dog Transmission) आता डब्ल्यूएचओही याबाबत सक्रिय झाले आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, हा विषाणू मानवाकडून प्राण्यांमध्येही पसरु शकतो. असेच एक प्रकरण समोर आले आहे. मंकीपॉक्सचा हा प्रकार मानवाकडून प्राण्यांमध्ये पसरल्याने तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. 94 देशांमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सचे 37,369 रुग्ण आढळले आहेत.

रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित  

लॅन्सेट जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. असे सांगण्यात आले आहे की पॅरिस, फ्रान्समधील सोरबोन विद्यापीठातील संशोधकांनी मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्या दोन पुरुषांचा अभ्यास केला. त्यांचा मंकीपॉक्स रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुमारे दीड आठवड्यानंतर त्याच्या 4 वर्षांच्या कुत्र्याचीही मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. कुत्र्याचा अहवाल आल्यावर डॉक्टरही अवाक् झाले. वास्तविक, कुत्र्यामध्येही मंकीपॉक्सची पुष्टी झाली होती.

कुत्र्यांमध्ये देखील मानवासारखी लक्षणे  

ज्यांनी त्यांचा अभ्यास केला त्यांना हे पाहून आणखीच आश्चर्य वाटले की कुत्र्याच्या शरीरावर मंकीपॉक्सची लक्षणे अगदी माणसांसारखीच होती. कुत्र्याच्या पोटाच्या खालच्या भागातही दाणे होते. याशिवाय त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पू भरलेले लाल फोड दिसून आले.

पाळीव प्राण्यांमध्ये प्रथमच पुष्टीकरण

तज्ज्ञांच्या पथकाने कुत्रे आणि त्यांच्या मालकांचे अहवाल तपासले तेव्हा असे आढळून आले की, विषाणूच्या डीएनएचा वंश B.1 आहे. ते एप्रिलपासून युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत पाळीव प्राण्यामध्ये संसर्ग झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. आफ्रिकन देशांमध्येही हा विषाणू फक्त जंगली उंदीर, गिलहरी आणि माकडे या प्राण्यांमध्ये आढळून आला आहे.