जीममध्ये माकडाची करामत! व्हारयल झालेला गमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरुन हसाल

जीममध्ये असलेल्या माकडामुळे गोंधळ उडाल्याचा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  या माकडाने सोशलमीडियावर चांगलीच हवा केली. 

Updated: May 26, 2024, 05:50 PM IST
जीममध्ये माकडाची करामत! व्हारयल झालेला गमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरुन हसाल title=

Viral Video : सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून कधी विनोदी तर कधी थक्क करणारे व्हिडीओ आपण पाहत असतो. त्यातल्या काही रील्सना कंटेंटमुळे कमी वेळातच  लाखो कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो.आपण सर्वांनीच लहानपणी नाचणाऱ्या माकडाचा खेळ पाहिला आहे. किंवा मग बाहेर फिरायला गेल्यावर माकड मागे लागल्याचे किस्से कधी ना कधी आपण एकलेलेच असतात. पण हेच माकड जेव्हा जीममध्ये असताना आपल्यामागे लागतं तेव्हा गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही. अशाच एका माकडाच्या व्हिडिओने चक्क सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. माकडाचा हा व्हिडीओ गमतीशीर व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. 

कधी ना कधी प्रत्येकाच्या मागे कुत्रा लागलेला असतो. पण माकड मागे लागलं तर ? एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चक्क जीम एका मुलाच्या मागे माकड लागल्याचा व्हिडीओसमोर आला आहे.व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील माकड हे जीममध्ये बरीच माणसं असून देखील एका मुलाचा पाठलाग करत तो जिथे जाईल तिथे त्याच्या मागे पुढे करताना दिसतो. जीममधला हा मुलाची माकडाला बघून चांगलीच घाबरगुंडी उडाली. माकडापासून लांब जाण्यासाठी हा मुलगा जीममधल्या इतर माणसांच्या मागे जाऊन लपला तरी माकड काही त्याचा पिच्छा सोडवत नाही.  माकडापासून सुटका करण्याकरीता हा मुलगा वेगवेगळे आवाज काढून त्याला हुस्कवून लावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र माकड काही त्याला सोडत नव्हतं. माकड आणि मुलाचा हा लपाछुपीचा खेळ नेटकऱ्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला. 

 

प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ पोस्ट होत असतात पण त्यातले  काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. इंस्टाग्रामवरील (@funfunnyoutube) या अकाउंटने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या गमतीशीर व्हिडिओ काही वेळातच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक, कमेंट आणि शेअर होत आहे. व्हायरल होणाऱ्या या माकडाच्या व्हिडिओमुळे तु्ही देखील हसून हसून पोट धराल. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून कमेंटचा पाऊस पडला आहे. अरे मित्रा त्याला तू आवडलास त्याला तुझ्याशी मैत्री कराविशी वाटतेय, असं एका  इंस्टाग्राम युजरने कमेंट केली. या व्हिडिओतील माकडाने नेटकऱ्यांना पोट धरून हसायला भाग पडलं.