Mongoose VS King Cobra Fight Video: किंग कोब्रा आणि मुंगूसची फाईट, वातावरण टाईट!

आपण साप आणि मुंगूसाच्या हाडवैराबाबत कायम ऐकलं आहे. पण त्यांच्यातील फाईट पाहणं हा अत्यंत थरारक अनुभव असतो. 

Updated: Aug 29, 2022, 07:52 PM IST
Mongoose VS King Cobra Fight Video: किंग कोब्रा आणि मुंगूसची फाईट, वातावरण टाईट! title=

Mongoose VS King Cobra: तुम्ही मुंगूस आणि सापाची लाईव्ह लढाई कधी पहिली आहे का? नसेल तर या बातमीत तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे, जे तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल.

आपण साप आणि मुंगूसाच्या हाडवैराबाबत कायम ऐकलं आहे. पण त्यांच्यातील फाईट पाहणं हा अत्यंत थरारक अनुभव असतो. यामध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत कायम सस्पेन्स पाहायला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

साप आणि मुंगूसची फाईट, वातावरण टाईट

या व्हिडीओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की कशा पद्धतीने किंग कोब्रा आणि मुंगूस एकमेकांवर वार पलटवार करत आहेत.

सुरुवातीलाच मुंगूस हा किंग कोब्रा सापावर जोरदार हल्ला चढवतो. मात्र, नंतर अचानक असं काही होतं ज्याने तुम्हीही चकित व्हाल.

एकदा हा सोशल मीडियावरील ट्रेंडिंग व्हिडीओ पाहाच.

 
या व्हिडिओमध्ये किंग कोब्रा आणि मुंगूस यांच्या लढतीचा काय निर्णय येतोय हे पाहण्यासाठी माणसं उभी असल्याचं दिसतं. सुरुवातीला मुंगूस सापावर जबरदस्त हल्ला चढवतो. यानंतर सापही पलटवार करताना दिसतो. मात्र या लढाईत मुंगूस बाजी मारताना पाहायला मिळत आहे.तुम्ही मुंगूसाच्या तोंडात साप स्पष्ट पाहू शकतात. 

व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे आणि विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.