नवं घर विकत घेणार्‍यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट !

प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.

Updated: Nov 19, 2017, 10:45 AM IST
नवं घर विकत घेणार्‍यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट ! title=

मुंबई : प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.

मोदी सरकारने यासाठी काही खास योजनांचं आयोजनदेखील केलं आहे. त्यानुसआर  २०२२ पर्यंत अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न आवाक्यात येणार आहे. एक हक्काचं आणि स्वतःचं घर असावं ही तुमचीदेखील इच्छा असेल तर मोदी सरकरची ही स्किम तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला हवी. सरकार आता ४ %  सबसिडी आणि घर विकत घेणं सुमारे ४ लाखांपर्यंत स्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.  पूर्वी केवळ बजेट होमसाठी असलेली ही सुविधा आता मोठ्या प्रकल्पांसाठीही लागू होणार आहे. 

 

कसा होणार फायदा ? 

तुमचं वार्षिक उत्त्पन्न जर 6 लाख ते 12 लाखांच्या दरम्यान असेल तर तुमची निवड (MIG-1) या कॅटेगरीमध्ये होते.  

(MIG-1)  कॅटेगरीतील ग्राहकांना ९६५ स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांच्या खरेदीवर सबसिडी मिळत असे पण आता ही मर्यादा १२९० स्क्वेअर फूटपर्यंतची घरं मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हांला २ बीएचके घर घेणं शक्य होणार आहे.  

तुमचं वार्षिक उत्त्पन्न जर १२-१८ लाख असेल तर तुम्ही (MIG-2) कॅटेगरीमध्ये समाविष्ट व्हाल. 
या कॅटेगरीमधील लोकांना आता १६०० स्क्वेअर फूट पर्यंतची घरं विकत घेणं शक्य होणार आहे. म्हणजेच ३ बीएचके फ्लॅटचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. 

  
  ४  लाखांपर्यंतचा फायदा कसा होणार ? 

    मध्यम वर्गीय लोकांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत होमलोनवर  ३-४ %   सबसिडी मिळते. 
  (MIG-1) साठी ४% तर  (MIG-2) साठी ३% सबसिडी मिळणार आहे. 
  बॅंका सध्या ८.५ % या दराने गृहकर्ज देतात. त्यामुळे जर तुम्ही सबसिडी स्किमचा वापर करून गृहकर्जासाठी प्रयत्न केले तर तुम्हांला हा व्याजदर ४.५ ते ५.५ इतका मिळू शकतो. म्हणजेच २.५ लाख रूपयांची सबसिडी आणि सोबत व्याजदरातून मिळालेला फायदा तुम्हांला सुमारे ४ ते साडे चार लाखांचा फायदा मिळवून देण्यास मदतशीर  होऊ शकतो.