Central Government : केंद्र सरकारचं या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, आता पगारात इतकी वाढ

केंद्र सरकारने (Central Government) मंत्रिमंडळ बैठकीत (Modi Cabinet Meeting)  मोठे निर्णय घेतले. 

Updated: Sep 28, 2022, 06:58 PM IST
Central Government : केंद्र सरकारचं या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, आता पगारात इतकी वाढ title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) मंत्रिमंडळ बैठकीत (Modi Cabinet Meeting)  मोठे निर्णय घेतले. मोदी सरकारने बहुप्रतिक्षित निर्णय अखेर घेतला. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Empolyees) मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा पगारही वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (modi government cabinet has decided increase da dearness allowance by 4 percent for central government employees and pensioners says minister anurag thakur)

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात एकूण 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरुन 38 टक्के इतका झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा हा 50 लाख कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून होतं.

सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी ही 1 जुलै 2022 पासून करण्यात येणार आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. याआधी सरकारने मार्च 2022 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

गरीब कल्याण अन्न योजनेत वाढ

मोदी सरकारने (Narendra Modi) गरीब कल्याण अन्न योजनेत  (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) तब्बल 3 महिन्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्यांना डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत या योजनेला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयामुळे देशातील जवळपास 80 कोटी जनतेला थेट लाभ मिळणार आहे.