Amazon सोबत फक्त 4 तास काम करा आणि महिना 60 हजार रुपये कमवा, कसं ते जाणून घ्या

सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे.

Updated: Sep 28, 2022, 06:52 PM IST
Amazon सोबत फक्त 4 तास काम करा आणि महिना 60 हजार रुपये कमवा, कसं ते जाणून घ्या title=

Earn Money With Amazon: तुम्ही फक्त 4 तास काम करून मासिक उत्पन्नात वाढ करू शकता. एका महिन्यात 60,000 रुपये आरामात कमवू शकता आणि ही संधी तुम्हाला देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी देत ​​आहे. आता Amazon साठी हाफ डे काम करून तुम्ही पैसे कमवू शकता. सध्या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे. डिलिव्हरी बॉय अ‍ॅमेझॉनच्या गोदामातून पार्सल घेतात आणि बूक केलेल्या मालकाकडे पोहोचवतात. एका डिलिव्हरी बॉयला एका दिवसात 100 ते 150 पॅकेज डिलिव्हर करावे लागतात. सर्व पॅकेजेस योग्य पत्त्यावर पोहोचवणे हे या मुलाचे काम आहे.

Amazon सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत डिलिव्हरी करते. दिल्लीचे डिलिव्हरी बॉय म्हणतात की, एका दिवसात 100-150 पॅकेजेस सुमारे 4 तासात वितरित करतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पदवीचीही गरज नाही. तुमच्याकडे बाइक किंवा स्कूटर असणे आवश्यक आहे. याशिवाय वाहतूक परवाना असणेही आवश्यक आहे. अ‍ॅमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow या साइटवर तुम्ही डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट अर्ज करू शकता.

Tata Tiago EV चं कोणतं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये? एका क्लिकवर संपूर्ण प्राइस लिस्ट

पगाराबद्दल बोललो तर निश्चित वेतन सुमारे 15 हजार रुपये आहे. याशिवाय एका पॅकेटवर 10 ते 15 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या म्हणण्यानुसार, जर कोणी महिनाभर काम करत असेल आणि दररोज 100 पॅकेजेस डिलिव्हरी करत असेल, तर तो महिन्याला 55000 ते 60000 रुपये सहज कमवू शकतो.