मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला ही खाती आली आहेत.

Updated: May 31, 2019, 02:44 PM IST
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं title=

नवी दिल्ली: मोदी सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडल्यानंतर शुक्रवारी मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. मोदींच्या मंत्रिमंळात एकूण ५७ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्री आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम होती. अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली. हे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे. यानंतर हे सर्व मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारतील.

मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे

* पंतप्रधान नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग या खात्यांची जबाबदारी असेल. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असेल. 

* अमित शहा- केंद्रीय गृहखाते

* निर्मला सितारामन- केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार

* राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय

* एस. जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय

* रविशंकर प्रसाद- कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

* स्मृती इराणी- केंद्रीय महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग

* नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

* सदानंद गौडा- रसायन व खते

* राम विलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
 
* नरेंद्र सिंह तोमर- कृषी व शेतकरी कल्याण
 
 * हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
 
*  रमेश पोखरियाल निशंक- केंद्रीय मनुष्यबळ खाते
 
*  थावर चंद गहलोत- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
 
*  अर्जुन मुंडा - आदिवासी व्यवहार

*  प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्रालय

* डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान व तंत्रज्ञान, वसुंधरा विज्ञान

* मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्याक व्यवहार

* प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा व खाण मंत्रालय

* महेंद्रनाथ पांडे- कौशल्य विकास आणि उद्योजकता

* अरविंद सावंत- अवजड उद्योग मंत्रालय

* गिरीराज सिंह- पशुकल्याण, दुग्धविकास, मत्योद्योग

* गजेंद्र सिंह शेखावत- जलपेय 

 

राज्यमंत्री  (स्वतंत्र प्रभार)

* श्री अनुराग सिंह ठाकूर- अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री

* श्री अंगदी सुरेश चनाबासप्पा- रेल्वे राज्यमंत्री

* श्री. नित्यानंद राय- गृह राज्यमंत्री

* श्री रतन लाल कटारिया- केंद्रीय जलपेय, सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री

* संतोष गंगवार- कामगार व रोजगार राज्यमंत्री

* राव इंद्रजित सिंह- सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन मंत्रालय (स्वतंत्र कार्य़भार)

* श्रीपाद नाईक- आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि आयुष राज्यमंत्री

* जितेंद्र सिंह- ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, पेन्शन, अणुउर्जा, अंतराळ विभाग राज्यमंत्री

* किरेन रिजिजू- उर्जा मंत्रालय, कौशल्य विकास राज्यमंत्री

* हरदीप सिंग पुरी- गृह व नगर विकास, नागरी उड्डाण, वाणिज्य व औद्योगिक राज्यमंत्री

* मनसुख मांडविया- जहाज, खते व रसायन राज्यमंत्री

राज्यमंत्री   
* फग्गनसिंग कुलस्ते (राज्य मंत्री) – पोलाद राज्यमंत्री 
* अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री 
* अर्जुनराम मेघवाल – संसदीय कामकाज मंत्रालय राज्यमंत्री 
* व्ही. के सिंग – परिवहन मंत्री आणि रस्ते विकास राज्यमंत्री
* कृष्णपाल गुर्जर – सामाजिक न्याय राज्यमंत्री
* रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण राज्यमंत्री
* किशन रेड्डी – गृह राज्यमंत्री 
* पुरुषोत्तम रुपाला – कृषी राज्यमंत्री 
* रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
* साध्वी निरंजन ज्योती – ग्रामीण विकास राज्यमंत्री
* बाबुल सुप्रियो – पर्यावरण व वन राज्यमंत्री
* संजीवकुमार बल्यान – पशुसवंर्धन आणि मत्सपालन राज्यमंत्री
* संजय धोत्रे – मनुष्यबळ राज्यमंत्री 
* अनुरागसिंह ठाकूर – अर्थ राज्यमंत्री 
* सुरेशचंद्र अंगडी – रेल्वे राज्यमंत्री 
* नित्यानंद राय – गृहराज्य मंत्री 
* रतन लाल कटारिया – जल आयोग आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री 
* व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री
*  रेणुका सिंह सरुता – आदिवासी राज्यमंत्री 
* सोम प्रकाश – वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री 
* रामेश्वर तेली – अन्न प्रकिया राज्यमंत्री
*  प्रतापचंद्र सारंगी – लघुद्योग राज्यमंत्री
*  कैलाश चौधरी – कृषी राज्यमंत्री
* देबश्री चौधरी – महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री