मिठाईमध्ये वापरले जाणारे 'सिल्व्हर वर्क' हे मांसाहारी असते? जाणून घ्या पडद्यामागील सत्य

आपल्यापैकी बहुतेकांनी 'चांदी' लावलेली मिठाई खाल्ली असेलच. अनेक लोक तर जास्त चांदी लावलेली मिठाई आवडीने खातात. खरंतर ही चांदीची मिठाईचे सौंदर्य वाढवते.

Updated: Jul 11, 2022, 05:10 PM IST
मिठाईमध्ये वापरले जाणारे 'सिल्व्हर वर्क' हे मांसाहारी असते? जाणून घ्या पडद्यामागील सत्य title=

मुंबई : आपल्यापैकी बहुतेकांनी 'चांदी' लावलेली मिठाई खाल्ली असेलच. अनेक लोक तर जास्त चांदी लावलेली मिठाई आवडीने खातात. खरंतर ही चांदीची मिठाईचे सौंदर्य वाढवते. तसे पाहाता पुजा किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपल्या घरी मिठाई आणली जाते. परंतु याबाबत असाही समज आहे की, ही अशी चांदी लावलेली मिठाई शाकाहारी नाही, त्यामुळे याचा पुजेत वापर करु नये. ज्यामुळे अनेक लोक संभ्रमात पडले आहे की,  हे शाकाहारी आहे की मांसाहारी?

याता यामाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला या चांदीच्या कागदाची बनवण्याची प्रोसेस जाणून घेऊ या.

हे कसे तयार केले जाते?

सिल्व्हर कागद ही खरं तर चांदीची एक अतिशय पातळ शीट आहे, जी पहिल्या दृष्टीक्षेपात अॅल्युमिनियमसारखी दिसते, परंतु जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला कळेल की, चांदीची आहे. चांदीचे फॉइल सडपातळ आणि खाण्यायोग्य बनवण्यासाठी त्यावर तज्ञ कारागीर काम करतात आणि त्याला तयार करतात.

'सिल्व्हर वर्क' प्रत्यक्षात चांदीच्या नॉन-बायोएक्टिव्ह तुकड्यांवर जोरात मारून-मारुन त्याची अशी शिट तयार केली जाते, जी अगदी एका फुंकरने देखील उडते. ते इतके पातळ होते की नुसत्या स्पर्शाने तुटते. तथापि, काही लोक त्यात कॅडमियम, निकेल, अॅल्युमिनियम आणि शिसे मिसळतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानीकार देखील असतात.

मांसाहारी 'सिल्व्हर वर्क' म्हणजे काय?

बऱ्याच लोकांना ही चांदी मांसाहारी आहे असा समज आहे, म्हणून ते बाजार, सण आणि लग्नांमध्ये चांदीच्या पन्नीने लेपित मिठाई खाणे टाळतात. याचे कारण असे की, अनेकदा सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये 'चांदीचे काम' जनावरांच्या चामड्यात ठेऊन तयार केले जातात असे सांगितले जाते.

परंतु हे देखील लक्षात घ्या की, आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने आता चांदीची अशी पानं तयार करण्यासाठी प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. परंतु तरीही काही भागात अजूनही चांदीची शिट बनवण्यासाठी जनावरांच्या कातडीचा वापर केला जातो. त्यासाठी हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा.

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सगळं लक्षात आलंच असेल. आता जर तुम्हाला शाकाहरी-मांसाहरी किंवा यामध्ये भेसळीचा संशय येत असेल तर 'चांदीची शीट' घ्या आणि तिला आग लावून बघा, त्याचा वास धातूसारखा असेल, तर ती खरी आहे, पण जर चरबीचा वास येत असेल, तर ती शीट शाकाहारी नाही हे समजून घ्या.