धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Updated: Jan 20, 2018, 02:00 PM IST
धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार title=

फरिदाबाद : माणूसकीला काळीमा फासणारी घटना हरयाणामधील फरिदाबाद शहरात घडली आहे.

एका अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कारमध्ये ओढले 

पीडित मुलगी शेतावर कामाला जात असल्यांनी ३ नराधमांनी तिला रस्त्यात अडविले. जबरदस्ती करत आपल्या खासगी वाहनात ओढले.

कार मिळेल त्या रस्त्याने पळवत तिच्यावर बलात्कार केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला जखमी अवस्थेत शेतात फेकून ते पळून गेले.

रुग्णालयात उपचार

शेतात जखमी अवस्थेत मुलीला पाहून गावकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पोलिसांची कारवाई

याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. 

सुरूवातीला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपामूळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत.